मिसिंग मुलगा सुरक्षित सापडला – मुरुडजवळ सायकलवर आढळला

 

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍ सचिन मयेकर | चौल — रेवदंडा 
  • 📅 सोमवार | १६ फेब्रुवारी २०२६

रायगड जिल्ह्यातील चौल दादर परिसरातून हरवलेला १२ वर्षीय मुलगा अखेर सुरक्षित सापडला आहे.

गंधार उत्तम परिट (वय १२) हा विद्यार्थी जि.प. शाळा चौल दादर येथून बेपत्ता झाला होता. तो हरवल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली होती.

दरम्यान, संबंधित मुलगा मुरुडजवळ सायकलवर जाताना आढळून आला. सुदैवाने तो पूर्णपणे सुरक्षित असून कोणतीही अनिष्ट घटना घडलेली नाही.

या घटनेमुळे पालकवर्गात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मुलगा सुखरूप सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

 पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याचे आणि अशा घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *