महाराष्ट्रात नव्याने ६५ कोविड-१९ रुग्णांची नोंद
यंदाचा वर्षातील एकूण रुग्णसंख्या १,५०४ वर
• छावा • अलिबाग, दि. १० जून • विशेष प्रतिनिधी
राज्यात सोमवारी(दि०९ जून) कोविड-१९ चे ६५ नवीन रुग्ण आढळून आले असून, यामुळे १ जानेवारी २०२५ पासूनची एकूण रुग्णसंख्या १,५०४ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २९ पुण्यात, २२ मुंबईत, पाच नागपूरमध्ये, चार कोल्हापुरात, दोन ठाणे जिल्ह्यात, तर सांगली, सातारा आणि परभणी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
या वर्षी आतापर्यंत राज्यात एकूण १७,२९२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील केवळ मुंबईतच ६८७ रुग्णांची नोंद झाली असून, यातील ६८१ रुग्ण मे महिन्यात आढळले आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण १८ जणांचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला आहे. यापैकी १७ जणांना अन्य आजार होते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.