महाअवतार नरसिंह – भक्तीचा शिखर, अत्याचाराचा अंत… आणि न्यायाची गर्जना! (ॲनिमेटेड चित्रपट समीक्षा)

छावा – रेवदंडा – सचिन मयेकर

भारतीय पुराणातील सर्वात थरारक क्षण म्हणजे – स्तंभ फाडून गर्जणाऱ्या नरसिंहाचा अवतार!

भक्त प्रल्हादाच्या निखळ श्रद्धेसमोर दैत्यराज हिरण्यकशिपूचा अहंकार चूर करणारा हा प्रसंग, महाअवतार नरसिंह या ॲनिमेटेड चित्रपटात इतक्या भव्यतेने साकारलाय की, पडद्यावरचा प्रत्येक फ्रेम जणू प्राण घेऊन उभी राहते.

चित्रपटाची सुरुवात निरागस, परमेश्वरावर अढळ विश्वास असलेल्या प्रल्हादापासून होते.

विष्णू आहे! – हे त्याचे प्रत्येक श्वासातलं सत्य.

पण समोर आहे पित्याचा रौद्र अहंकार – माझ्याशिवाय कोणी देव नाही!

पहिल्या अर्ध्यात हिरण्यकशिपूचा अत्याचार वाढत जातो.

दरबार भयभीत आहे, पण प्रल्हाद आपल्या श्रद्धेवर ठाम.

त्याचा संवाद –

विष्णू माझं रक्षण करतील

प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणतो.

दुसऱ्या अर्ध्यात – राजदरबारात उभा प्रल्हाद.

हिरण्यकशिपू उपहासाने विचारतो –

तुझा विष्णू कुठे आहे? या खांबात आहे का?

प्रल्हाद हसून म्हणतो

तो सर्वत्र आहे!

धाड! – स्तंभ चिरून बाहेर पडतो अर्धमानव-अर्धसिंह – रौद्र, भव्य, तेजस्वी!

डोळ्यांत जळता अग्नि, गळ्यात सिंहाची गर्जना, आणि देहावर आकाशाएवढा तेज.

थिएटर हादरून जातं, आणि प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात.

नरसिंह प्रकटताच राक्षस योद्ध्यांचा हल्ला सुरू होतो.

अॅनिमेशनमधील वेग, हालचालींचा जोर, आणि प्रत्येक प्रहारातील ताकद – पडद्यावर जिवंत भासते.

काही क्षणांत संपूर्ण राक्षसदल संपवून टाकलं जातं.

दरबारात फक्त प्रल्हाद, सिंहासन आणि हिरण्यकशिपू उरतो.

हिरण्यकशिपू नरसिंहावर झेपावतो.

नरसिंह त्याला पकडून दरवाज्याच्या उंबरठ्यावर आणतो –

ना घरात, ना घराबाहेर… संध्याकाळच्या त्या क्षणी,

त्याच्या वरदानाच्या प्रत्येक अटीचा भंग करत नखांनी त्याचे उदर फाडतो.

अत्याचाराचा अंत होतो.

सर्व देव प्रकट होतात – हिरण्यकशिपूच्या अहंकारामुळे हरवलेली त्यांची शक्ती परत मिळते.

पण नरसिंह अजूनही उग्र आहे, गर्जना थांबत नाही.

देव म्हणतात

उग्र नरसिंहाला शांत करू शकणारा फक्त तोच आहे, ज्याच्यासाठी तो भडकून आला आहे – भक्त प्रल्हाद!

प्रल्हाद नरसिंहासमोर येतो.

त्याचे निरागस डोळे पाहताच नरसिंहाची गर्जना मंदावते, श्वास स्थिर होतो…

रूप उग्रतेतून स्नेहपूर्ण होतं.

नरसिंह त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतो.

ॲनिमेशन आणि दृश्य मांडणी

नरसिंहाच्या पात्राचं डिझाइन – उग्र चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांतील ज्वाला आणि हालचालींचा वेग – विलक्षण प्रभावी.

प्रल्हादाचं कॅरेक्टर – निरागसता आणि श्रद्धा भरलेलं, प्रत्येक फ्रेमला जीव देणारं.

हिरण्यकशिपू – अॅनिमेशनमधील रौद्रता आणि अहंकाराची पराकाष्ठा.

पार्श्वसंगीतात ढोल-ताशांचा गजर, शंखनाद आणि शेवटच्या प्रसंगात मृदू सूर – भावनांचा परमोच्च अनुभव.

महाअवतार नरसिंह हा केवळ ॲनिमेटेड धार्मिक चित्रपट नाही – तो भक्ती, धैर्य, करुणा आणि न्यायाचा जिवंत पुरावा आहे.

सिनेमाचा शेवट थरार देऊन मनात खोलवर उतरणारी शांती देतो.

रेटिंग : ⭐⭐⭐⭐(5/5 – भावनिक आणि भव्यतेचा परमोच्च अनुभव)

पाहायलाच हवा

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *