मंदिरफोडी करणाऱ्या थेरोंडा आगल्याची वाडी येथील महेश चायनाखवा यास १ वर्ष सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा धडाकेबाज निकाल
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा 📅 बुधवार | २५ फेब्रुवारी २०२६
रेवदंडा पोलीस ठाणे गुन्हा क्र. 119/2023 मधील मंदिरफोडी प्रकरणात दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, अलिबाग न्यायालय यांनी आरोपीस दोषी ठरवत शिक्षा ठोठावली असून महेश नंदकुमार चायनाखवा (वय 38, रा. थेरोंडा, आगल्याची वाडी, ता. अलिबाग, जि. रायगड) यास भारतीय दंड विधान कलम 380 व 457 अन्वये प्रत्येकी 1 वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ₹2,000/- दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सदर आरोपीने थेरोंडा गावातील पाच पाढे कोळी समाजाच्या खंडोबा मंदिराचे दरवाजे उघडून मंदिरात प्रवेश करत लाकडी देव्हाऱ्यातील तीन मोठ्या चांदीच्या मूर्तींचे टाक, सहा लहान चांदीच्या मूर्तींचे टाक व एक चांदीचा लोलक असा ₹94,800/- किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता, तसेच आगल्याची वाडी येथील मुंबईकर कुटुंब व ढोलके कुटुंबीयांच्या कुलदेवतांच्या रूमची कडी तोडून चार चांदीचे मूर्तींचे टाक, एकवीरा देवीचा चांदीचा मुखवटा व चांदीचा लोलक असा अनुक्रमे ₹37,800/- व ₹28,200/- किमतीचा ऐवज चोरी करून नेला होता, ज्यामुळे एकूण ₹1,60,800/- किमतीचा मुद्देमाल धार्मिक स्थळांमधून चोरीस गेला होता.
रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोसई श्री डी. जे. म्हशिलकर व पोनि श्री देविदास मुपडे यांनी कौशल्यपूर्ण तपास करत संपूर्ण ₹1,60,800/- किमतीचा चांदीचा मुद्देमाल जप्त करून तो फिर्यादी गोरक्षनाथ लक्ष्मण नवरीकर, रा. थेरोंडा, खंडेराव पाडा यांना परत केला असून संबंधित मंदिर व कुलदैवतांची व्यवस्था स्थानिक ट्रस्टमार्फत केली जाते आणि थेरोंडा ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.

![]()

