भारतरत्न राजीव गांधी — आधुनिक भारताचे शिल्पकार, जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

आज, २० ऑगस्ट, हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्मरणाचा.
सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल
१९४४ मध्ये मुंबई येथे जन्मलेले राजीवजी अल्पायुष्यातच भारताला आधुनिकतेकडे नेणारा मजबूत पाया घालून गेले.
फक्त ४० व्या वर्षी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारून राजीव गांधींनी भारताच्या नव्या पिढीला दिशा दिली.
त्यांनी संगणकयुग, दूरसंचार, आणि शिक्षण सुधारणा यामधून तरुणाईला आधुनिक जगाशी जोडले.
भारतातील संगणकीकरण आणि माहिती-तंत्रज्ञानाची पायाभरणी
दूरसंचार क्रांती घडवून STD/ISD सुविधा जनतेपर्यंत नेल्या
राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि विद्यापीठांची बळकटी
पंचायती राज प्रणालीद्वारे लोकशाही तळागाळात नेली
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ठाम आणि सन्माननीय भूमिका.
आजचा डिजिटल भारत, संगणक-युगातील प्रगती आणि ग्रामीण लोकशाहीचा विस्तार – ही सर्व राजीवजींच्या दूरदृष्टीची फलश्रुती आहे.
त्यांचे विचार आजही देशाला मार्गदर्शन करतात.
राजीव गांधी यांच्या जन्मदिनाचे रूपांतर सद्भावना दिनात झाले.
राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सौहार्द आणि शांतता हा संदेश या दिनाच्या स्मरणातून पुन्हा अधोरेखित होतो.
आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व भारतीय भारताचे आधुनिकतेचे शिल्पकार राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन करतो.
त्यांची स्वप्ने आणि दृष्टी भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा ठरत राहतील.
जय हिंद…