भामटा : पैशांची किंमत आणि सणाचा हृदयस्पर्शी धडा

भामटा एका छोट्या गावी भटकत गेला आणि एका घरात थांबला.घरात गणपती बाप्पा विराजमान झाले होते, पण वातावरण मात्र वेगळंच होतं. डोळ्यांत आनंद नव्हता, तर चिंता, दुःख आणि एक अढळ हुरहूर होती.

सचिन मयेकर, संपादकीय ‘छावा’ पोर्टल २८ ऑगस्ट २०२५

खूप खूप वर्षांपूर्वी, भाद्रपद शुद्ध

ते कुटुंब नुकत्याच झालेल्या मोठ्या दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतं—घरात वडिलांची सावली हरवलेली, संसार डळमळलेला. आणि त्यावर आर्थिक संकटाची जोड. पहिलाच गणपती बाप्पा, पण खिशात पैसे नाहीत.

त्या घरातल्या माणसाच्या हातात ९६० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट होता—आजच्या काळात पंचवीस हजाराएवढी किंमत. तो बँकेत गेला, खिशात फक्त पंधरा रुपये. मनात आशा होती—“आज पैसे मिळतील, घराला दिलासा मिळेल.”

पण बँकेत समजलं—तो ड्राफ्ट इथे खात नाही, खाते उघडल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, तेही आठ दिवसांनी.

त्या माणसाच्या चेहऱ्यावर निराशेचा डोंगर कोसळला. परतीचा चार किलोमीटरचा रस्ता पाय जड करून गेला.

तो घरी परत आला तर पूजा करणारे मंडळी आलेली होती. पण वर्गणी द्यायलाही पैसे नव्हते.

तेवढ्यात पुण्याहून आलेली त्याची ताई पुढे आली. तिने आपल्या हातून पैसे दिले आणि त्या घराला संकटसमयी आधार दिला. आठ दिवसांनी ड्राफ्ट वटला खरी, पण त्या क्षणाचा दिलासा पैशांपेक्षा कितीतरी मोठा ठरला.

आनंद तोच, जो आपण दुसऱ्याच्या दुःखात हात देतो.

भामटा

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *