फेब्रुवारीत लग्न ठरलं होतं… पण साखरपुड्याच्या आदल्या दिवशी उघडकीस आलं काळीज हादरवणारं सत्य

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ सचिन मयेकर
  • 📅 शुक्रवार , १६ जानेवारी २६

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. साखरपुड्याच्या आदल्या दिवशी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात विवाह ठरवण्यात आलेल्या या मुलीला साखरपुड्याच्या आदल्या दिवशी अचानक तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे तिला तातडीने रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत गर्भधारणा स्पष्ट होताच संपूर्ण गंभीर प्रकाराचा पर्दाफाश झाला

या प्रकरणी पोलिसांनी समीर नारायण नाईक (वय 20) या तरुणाला अटक केली आहे. प्राथमिक तपासात, नोव्हेंबर 2024 मध्ये आरोपी आणि पीडितेची ओळख झाली होती. पुढे ही ओळख प्रेमसंबंधात बदलली. मात्र, जानेवारी 2025 पासून आरोपीने अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे. या अत्याचारातूनच पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

आरोपीने मुलीच्या घरात तसेच पोयनाड येथील आदिवासी पाडा परिसरात तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मुलगी अल्पवयीन असतानाही कुटुंबीयांनी तिचा विवाह ठरवला होता, ही बाब आरोपीला माहीत असूनही त्याने अत्याचार सुरूच ठेवले.

माहितीनुसार, 8 जानेवारी 2026 रोजी साखरपुडा आणि 24 फेब्रुवारी 2026 रोजी विवाह ठरवण्यात आला होता. दोन्ही कुटुंबीयांकडून लग्नाची तयारी सुरू असतानाच 7 जानेवारी 2026 रोजी हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

घटनेनंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी 13 जानेवारी 2026 रोजी आरोपीला अटक केली. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act 2012) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS Act 2023) मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दगू बाजीराव गांगुर्डे करत आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *