पोलादपूर हादरलं! लग्नाच्या आमिषाखाली विद्यार्थिनीवर अत्याचार; नाशिकहून आरोपीला बेड्या
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल✍ सचिन मयेकर,|पोलादपूर 📅 रविवार | २२ फेब्रुवारी २०२६
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका पुन्हा एकदा हादरला आहे. लग्नाचे आमिष दाखवून करंजखोल (ता. महाड) येथील एका विद्यार्थिनीवर इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी गर्भवती असतानाही तिच्यावर जबरदस्ती करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप फिर्यादीत नमूद आहे.
पीडितेने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पोलादपूर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला नाशिक येथून अटक केली.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दि. २१ डिसेंबर २०२४ ते १४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपीने लग्नाचे आश्वासन देत पीडितेला पोलादपूर येथील मोहितबाग लॉज, महाडमधील हॉटेल आंगण लॉज तसेच ठाणे आणि नाशिक येथील विविध लॉजवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. या संबंधातून तरुणी गर्भवती राहिली; तरीदेखील जबरदस्ती सुरूच असल्याचा आरोप आहे
या प्रकरणी आरोपी म्हणून प्रसाद जिभाऊ नाडेकर (वय २३, रा. संत सावरकर नगर, पेठ रोड, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. ०६/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहें .या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलादपूर पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश आर. मुंढे यांनी विशेष पथकासह नाशिक येथे जाऊन आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. तक्रार दाखल होताच जलद हालचाली करत आरोपीच्या ठिकाणाचा शोध घेण्यात आला आणि त्याला अटक करून महाड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली असून पुढील तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.
अटक केल्यानंतर आरोपीला महाड न्यायालय समोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलादपूर पोलीसांकडून सुरू आहे.
![]()

