पेण पोलिसांची धडाकेबाज कारवाई : जनावरांना गुंगीचे औषध देऊन वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
छावा डिजिटल न्यूज पोर्टल — सचिन मयेकर — गुरुवार – १३ नोव्हेंबर २०२५
पेण तालुक्यातील वरसई फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री पेण पोलिसांनी धाडसपूर्ण कारवाई करत जनावरांची अमानुष तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपी गुंगीचे औषध देऊन जनावरांना बेशुद्ध करून दोन चारचाकी वाहनांत कोंबून वाहतूक करत होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून आरोपींना गजाआड केले.
या प्रकरणी शरीफ रफिक अन्सारी (२५), इम्रान मलंग पटेल (३६, मुंब्रा), सलमान अब्दुल अहमद पटेल (३६), सोनू जुबेर खान (२२) आणि बाजल रशीद शेख (१९, पनवेल) या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर अजित शेख (रा. तळोजा) हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या कारवाई संदर्भात स्वप्निल गजानन म्हात्रे यांनी पेण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या धाडसी कारवाईमुळे जनावरांच्या तस्करीत मोठ्या टोळीचा भांडाफोड झाला असून, या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील पोलिसांची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
![]()

