पेझारीत भाजपा महिला मोर्चाचा निषेध आंदोलन : पंतप्रधान मोदी व त्यांच्या मातोश्रींचा अपमान करणाऱ्या व्हिडिओचा तीव्र निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मातोश्रींवर अपमानकारक एआय व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या निषेधार्थ आज भाजपा महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्ह्याच्यावतीने पेझारी येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.
पेझारी — सचिन मयेकर, ‘छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १४ सप्टेंबर २०२५
या आंदोलनाचे नेतृत्व भाजपा महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. सौ. चित्रा आस्वाद पाटील यांनी केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक स्तरावरील सर्वात सक्षम नेतृत्व असून त्यांनी जगभर भारताचा ध्वज अभिमानाने फडकावला आहे. त्यांच्या मातोश्रींबाबत अशा प्रकारे निंदनीय व्हिडिओ तयार करणे ही काँग्रेसच्या राजकीय असंस्कृत मानसिकतेची पावती आहे. एका अराजकीय आणि दिवंगत मातोश्रींचा अपमान करून भारतीय जनतेच्या भावना दुखावण्याचा कोणताही प्रयत्न भाजपा महिला मोर्चा कधीही सहन करणार नाही.

आंदोलनावेळी महिलांनी संताप व्यक्त करत काँग्रेसचा निषेध असो माँ का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निषेधाची नोंद केली, तर स्थानिक नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. कार्यक्रम शांततेत, पण ठामपणे पार पडला. आंदोलनाच्या शेवटी भारतीय लोकशाहीचे मूल्य आणि नेत्यांच्या सन्मानाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
यावेळी मा. खा. धैर्यशील दादा पाटील (जिल्हाध्यक्ष भाजपा द. रायगड), मा. आ. प्रशांतदादा ठाकूर (भाजपा उ. रायगड), मा. आ. पंडितशेठ पाटील, डॉ. सौ. चित्राताई पाटील (जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा भाजपा द. रायगड), ऍड. महेशजी मोहिते (जिल्हा सरचिटणीस भाजपा द. रायगड), मा. आस्वाद पाटील (मा. रा. जि. प. अध्यक्ष), मा. हेमाताई मानकर (जिल्हा सरचिटणीस), श्री. राजेश मापारा, श्री. सवाई पाटील (उपाध्यक्ष भाजपा द. रायगड), सरचिटणीस प्रीती पाटील, सरचिटणीस रश्मी वाजे, सरचिटणीस वंदना म्हात्रे, स्मिता पाटील (उपाध्यक्ष भाजपा द. रायगड), कुंदा गावंड (चिटणीस महिला मोर्चा), स्मिता पाटील (उपाध्यक्ष महिला मोर्चा), चेतन पाटील (मंडळ अध्यक्ष अलिबाग उत्तर), रोशन भगत (मंडळ अध्यक्ष अलिबाग मध्य), अपर्णा सुटे (महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष नागोठणे), सारिका पाटील (महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष हमरापूर), भाग्यश्री देशमुख (महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष महाड उत्तर) आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
![]()

