पूरस्थिती विशेष अहवाल | रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत | प्रशासन सतर्क

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)
दि. १५ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंतचा पूरपरिस्थिती अहवाल रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला असून, जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
आज दिवसभरात १३३६९ मिमी इतका पावसाचा नोंद झाला असून, सरासरी पर्जन्यमान ८५.५६ मिमी इतकं आहे. जोरदार पावसामुळे काही नद्या व पुलांवर पुराचा धोका निर्माण झाला आहे.
वाहतूक काही भागांत मर्यादित किंवा पूर्णतः बंद:
पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग, पुलं आणि घाटांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे.
तालुकानिहाय पूरस्थिती:
१. तलासरी तालुका:
महाड शिवथरघळ ते महाड येथील गावा जवळील नद्यांमध्ये पाणी धावून गेले आहे.
साळीणी नदीचं पाणी महाड शहरात शिरले असून रावदळ पुलाजवळील पाणी वाढल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
२. महाड:
विष्णू विमानतळ नजिकची नदीपात्रं बुडून भरली आहेत.
मंदिराच्या पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली.
शहरातून जाणारी दुसरी मार्गिकाही पाण्याखाली असून पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
साळीणी बायपास रस्त्यावर पाणी असून खबरदारी घेत वाहतूक सुरू आहे.
३. रोहा:
निसर्गहिंद परिसरात झाडे व पडझड झाल्याने वीज पुरवठा खंडित.
आंबेवाडी-कोलाड परिसरात दुकानांत पाणी शिरले.
नागोठणे जवळील रेल्वे ब्रिजपर्यंत पाणी साचले आहे.
शिरवली गावात पाणी घरांत शिरले आहे.
बौद्धवाडी येथील धर्मबाई बाबुराव शिर्के यांचे घर अंशतः पडले.
४. पोलादपूर:
आंबेनळी घाटात दरड व माती कोसळल्याने वाहतूक पूर्णतः बंद.
भोर-सवाड, धारसिव, माटवण परिसरात पाणी शिरले आहे.
काही गावांत पाणी घरात घुसले असून JCB साहाय्याने माती बाजूला करण्यात आली.
५. अलीबाग:
रामराज पुलावर व अलीबाग बाजारपेठेत पाणी शिरले.
६. म्हसळा:
धोरोजे येथे नदीपुलावर मोठ्या प्रमाणात पाणी असून वाहतूक बंद.
७. सुधागड-पाली:
वावकोळी येथे सुशाभ मारुती महाले यांचे घर भिंत कोसळून अंशतः पडले.
८. श्रीवर्धन:
रानवली येथे एक कच्चं घर पडले.
प्रशासन सतर्क, मदत व बचाव पथक सज्ज:
रायगड आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय झाली असून मदत व बचाव पथक तयार ठेवण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस, पोलीस नियंत्रण कक्ष तसेच ग्रामपंचायतींनीही नागरिकांना सतर्कतेचे इशारे दिले आहेत.
नागरिकांना प्रशासनाची विनंती:
अनावश्यक प्रवास टाळावा.
नदी, ओढ्यांच्या काठावर जाणे टाळा.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.
पुराचा धोका असलेल्या भागात त्वरित स्थलांतर करा.