पुण्याचा ग्रामदैवत कसबा गणपती जिजाऊंच्या संकल्पातून उभी राहिलेली परंपरा

इ.स. १६३० च्या सुमारास मुरार जगदेव या क्रूर करम्यान औरंगजेबाच्या आदेशावरून पुणं जाळून टाकलं. गाव उद्ध्वस्त झालं, देवळं नष्ट झाली, लोकांना पळ काढावा लागला. त्याच काळात पुणं म्हणजे जणू राखेचा ढिगारा झाला होता.
सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल ३० ऑगस्ट २०२५
पुण्याचा मानाचा पहिला गणपती! जिजाऊ आईनी प्रतिष्ठापित केलेला कसबा गणपती पुण्याचेग्रामदैवत.
त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज अगदी लहान होते. त्यांच्या संगोपनाची व जहागिरीची धुरा जिजाऊ माऊसाहेबांच्या हाती होती. अशा परिस्थितीत त्यांनी पुण्याला पुन्हा जिवंत करण्याचा संकल्प केला
जिजाऊ साहेबांनी सर्वप्रथम देवस्थानांचे पुनरुज्जीवन करण्यास सुरुवात केली. कसबा पेठेत देवळाचे अवशेष दिसत होते. तेथे सापडलेली गणेशाची मूर्ती त्यांनी अत्यंत भक्तिभावाने पुन्हा प्रतिष्ठापित केली.
हा गणपती म्हणजे पुढे पुण्याचा ग्रामदैवत ठरला. आज त्यालाच आपण कसबा गणपती या नावाने ओळखतो.
कसबा गणपतीला पुण्यातील मानाचा पहिला गणपती मानले जाते.
गणेशोत्सवाच्या काळात या मंदिराला विशेष महत्त्व असते.
विसर्जन मिरवणुकीची सुरुवात देखील याच गणपतीच्या मानाच्या मिरवणुकीने होते.
हे मंदिर पुण्याच्या कसबा पेठ भागात, शनिवारवाड्याजवळ स्थित आहे.
कसबा गणपतीच्या या प्रतिष्ठापनेतून पुण्याच्या नव्या जीवनाचा आरंभ झाला. पुढे महाराजांनी मोठे होऊन स्वराज्याचा विस्तार केला, पण पुण्याच्या पुनर्निर्माणाचा पहिला पायाभरणी दगड जिजाऊ साहेबांच्या हातीच ठेवला गेला.
आजही पुण्यातील लाखो भाविक कसबा गणपतीला ग्रामदैवत म्हणून वंदन करतात. विशेषत: गणेशोत्सवाच्या वेळी येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते. मिरवणुकीत कसबा गणपतीला पहिला मान दिला जातो, ही परंपरा अखंड सुरू आहे.
जिजाऊंचा तो संकल्प, राखेतून उभं राहिलेलं पुणं, आणि ग्रामदैवत कसबा गणपती हा इतिहास आजही प्रत्येक
पुणेकराच्या हृदयात आदर व अभिमान जागवतो.