रविवार विशेष — पालखीचा पडदा सरकला तान्हाजीचा रक्ताने माखलेला देह दिसला गड आला… पण माझा सिंह गेला थरथरत्या आवाजात गरजले छत्रपती
रविवार विशेष
आज दिनांक ४ जानेवारी २०२५, रविवार रोजी नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल शिवराज मालुसरे यांची महाड (जि. रायगड) येथे प्रत्यक्ष भेट घेऊन, त्या भेटीतून मिळालेल्या माहितीसह त्यांच्या लिखित नोंदी व घराण्याच्या ऐतिहासिक दस्तऐवजांवर आधारित हा विशेष ऐतिहासिक लेख सादर करण्यात येत आहे.
सचिन मयेकर | छावा
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 रविवार , ४ जानेवारी २६
छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे प्रखर बुद्धिमत्ता अलौकिक शौर्य मुत्सद्देगिरी चातुर्य आणि दूरदृष्टी यांचा संगम होय शिवरायांनी आपले सर्वस्व मावळ्यांना अर्पण केले आग्र्याहून सुटका असो वा अफजलखान वध पन्हाळगडावरून सुटका असो वा शाहिस्तेखानावर छापा प्रत्येक प्रसंगी त्यांनी जीवाची पर्वा केली नाही मावळ खोऱ्यात पेटलेली स्वराज्याची ज्वाला त्यांनी समुद्रकिनाऱ्यापर्यंत नेली नेतृत्व नीतिमान असेल तर प्रजाही नीतिमान घडते हा आदर्श संपूर्ण जगाला शिवरायांनी दिला म्हणूनच ते विश्ववंदनीय कल्याणकारी राजा ठरले त्यांच्या स्वराज्यात जीवाला जीव देणारे हसत हसत मरण ओढवून घेणारे मावळे घडले या महाराष्ट्राच्या सार्वभौमत्वासाठी असंख्य ज्ञात अज्ञात शिलेदारांनी आपल्या जीवनाच्या पायघड्या स्वराज्यासाठी घातल्या जगायचं या मातीसाठी आणि मरायचंही या मातीसाठीच ही भावना त्यांच्या रक्तात भिनलेली होती अशाच दिव्य बलिदानाच्या परंपरेतून घडलेले एक स्वराज्यनिष्ठ कर्तव्यनिष्ठ आणि सिंहासारखे व्यक्तिमत्व म्हणजे नरवीर तान्हाजी मालूसरे होत आपण सहज म्हणतो तान्हाजी मालुसरे उमरठचे पण सत्य अधिक खोल आहे तान्हाजी मालुसरे यांचे जन्मगाव गोडवली असून तपनेश्वर शंभू महादेवाच्या कृपेने काळोजी रावांना झालेल्या पुत्ररत्नाचे नाव तान्हाजी ठेवले गेले उपलब्ध पत्रांमध्येही तान्हाजी हाच उल्लेख आढळतो गोडवलीवर यवनांच्या हल्ल्यात तान्हाजींचे वडील काळोजी आणि काका भवरजी धारातीर्थी पडले त्यानंतर त्यांचे मामा रायाजी कोंडाजी शेलार यांनी आपली बहीण तान्हाजी आणि सूर्याजी यांना कुडपण येथे आणले मात्र तेथेही सुरक्षितता नसल्याने उमरठ गावाजवळील मोरझत धबधब्याच्या बाजूच्या गुहेत आठ दिवस आश्रय घ्यावा लागला याच वेळी उमरठचे कळंबे पाटील यांच्या माणुसकीमुळे त्यांना राहण्याची जागा आणि कसायला जमीन मिळाली आणि याच उमरठच्या लाल मातीत तान्हाजी घडत गेले शेलारमामांनी तान्हाजी व सूर्याजी यांना कुस्ती तलवारबाजी दांडपट्टा घोडेस्वारी गोफण अशा युद्धकलेचे कठोर प्रशिक्षण दिले याच काळात राजगडावर जिजाऊ आईसाहेब शिवरायांना स्वराज्याचे संस्कार देत होत्या शेलारमामा आपल्या भाच्यांसह राजगडावर दाखल झाले आणि स्वराज्यकार्याला सुरुवात झाली रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताच्या अभिषेकाने स्वराज्याची शपथ घेतली गेली तेव्हा शिवरायांसोबत तान्हाजी मालुसरे होते तोरणा राजगड रोहीडा पुरंदर कोंढाणा अशा प्रत्येक मोहिमेत तान्हाजी अग्रस्थानी राहिले चर्चेत शांत आणि रणांगणात सिंहासारखे लढणारे तान्हाजी बुद्धीनेही चाणाक्ष होते प्रतापगडाच्या मोहिमेत त्यांच्याकडे पायदळाची जबाबदारी देण्यात आली जावळीच्या मोऱ्यांचे पारिपत्य करून रायगड स्वराज्यात आला कोकणातील घाटमाथे दऱ्या किनारपट्टी यांची खडानखडा माहिती असल्याने तान्हाजींना कोकण प्रांताची सुभेदारी देण्यात आली आणि त्यांच्या स्वामीनिष्ठ कारभारामुळे तळकोकण स्वराज्यात आला सुभानमंगळ किल्ल्याच्या मोहिमेत त्यांनी बाळाजी हैबतरावाला पळता भुई थोडी केली लोहगड विसापूर प्रबळगड सरसगड कल्याण भिवंडी राजमाची अशा अनेक मोहिमांत ते सावलीसारखे महाराजांसोबत राहिले कारतलबखानाच्या कोकण स्वारीत उंबरखिंडीत नेताजी पालकरांसह खानाच्या फौजेची दाणादाण उडवली लढाई कोणतीही असो तान्हाजी ती निधड्या छातीने लढायचे म्हणूनच ते शिवरायांचा उजवा हात म्हणून ओळखले गेले शाहिस्तेखानाच्या छाप्याच्या वेळी कात्रज घाटात सोंग वठवण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली डच आणि पोर्तुगीजांवर नजर ठेवण्यासाठी जेव्हा जलदुर्ग उभारण्याचे ठरले तेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी तान्हाजी मालुसरेंवर सोपवण्यात आली आणि त्यांच्या कल्पक बुद्धीची साक्ष आजही तो किल्ला देतो पुरंदरच्या तहानंतर अनेक किल्ले परत मिळाले पण कोंढाणा अजूनही यवनांच्या ताब्यात होता याच काळात रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन तान्हाजी राजगडावर गेले असता महाराजांनी कोंढाण्याच्या मोहिमेचा विचार सांगितला आणि तान्हाजी गरजले महाराज आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं त्यानंतर मध्यरात्रीचा हल्ला तुटलेली ढाल शेलारमामांचा अखेरचा वार आणि अखेरीस कोंढाण्याची माती तान्हाजींच्या रक्ताने पावन झाली गड जिंकला गेला आणि सारेजण राजगडाकडे निघाले पालखी पद्मावती माचीवर आली भोयाने हळूच पडदा बाजूला केला आणि त्या क्षणी काळजाचा ठोका चुकावा असा प्रसंग घडला रक्ताने माखलेला रणांगणात सिंहासारखा झुंज देऊन शांत झालेला तान्हाजी महाराजांच्या नजरेसमोर आला क्षणभर शिवराय स्तब्ध झाले डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला आवाज भरून आला आणि त्यांच्या ओठांतून शब्द बाहेर पडले अरेरे माझा तान्हा गेला माझा उजवा हात गेला गड आला पण माझा सिंह गेला त्या शब्दांत केवळ शोक नव्हता तर एका राजाचा आपल्या मावळ्यावरचा पित्यागत जिव्हाळा होता स्वराज्यासाठी हसत हसत मरण पत्करणाऱ्या वीराचं ओझं त्या क्षणी
महाराजांच्या हृदयावर कोसळलं त्यांनी गळ्यातील समुद्र कवड्यांची माळ अलगद काढली आणि तान्हाजींच्या निश्चल देहावर ठेवली जणू सांगत होते तू गेलास तरी स्वराज्याच्या श्वासात तू सदैव जिवंत राहशील त्या क्षणी राजगड मुकाट रडत होता सह्याद्रीचा कडा थरथरत होता आणि इतिहासाच्या काळजावर हा प्रसंग कायमचा कोरला जात होता गोडवली ही तान्हाजींची जन्मभूमी उमरठ ही कर्मभूमी जिथे त्यांची अग्निसमाधी आहे आणि सिंहगड ही त्यांची शौर्यभूमी ठरली त्यानंतर रायबाचे लग्न लावून पारगडची किल्लेदारी देण्यात आली आणि चंद्रसूर्य असेपर्यंत गड जागता ठेवण्याचा आदेश दिला गेला मालुसरे घराण्याच्या पिढ्यान्पिढ्या हा वारसा जपला गेला आजही साडेतीनशे वर्षांपूर्वीची कवड्यांची माळ पारगडची सनद आणि शेकडो पत्रे हा जिवंत इतिहास म्हणून जपला जात आहे आणि हा इतिहास केवळ भूतकाळ नाही तर स्वराज्याच्या मूल्यांचा चालता बोलता वारसा आहे.


महाड येथे झालेल्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान डॉ. शीतल शिवराज मालुसरे यांच्यासोबत आशिष अनंत गोंधळी, प्रतीक नंदकुमार साळुंखे व पत्रकार सचिन मधुकर मयेकर व चिमुकला श्रेयान..
![]()


