सुजन पब्लिक स्कूल सील प्रिंसिपल रीना ड्रायव्हर अजय अटकेत संपूर्ण स्टाफवर संतापाची लाट
पानीपत — सुजन पब्लिक स्कूलमध्ये मुलावर झालेल्या अमानुष छळाचा व्हायरल फोटो
सात वर्षाच्या मुलाला उलटे लटकवून बेदम मारहाण – पालक, समाज हादरले; “शिक्षण मंदिर” की “छळछावणी”
🔴 काय घडलं?
छावा डिजिटल न्यूज पोर्टल — पानिपत ३० सप्टेंबर (PTI):

ज्या क्रूर कर्मांची मालकीण — शिक्षण मंदिर काळवंडणारी हीच ती प्राचार्या!”
हरियाणातील पानीपतच्या सुजन पब्लिक स्कूलमध्ये दुसरीतील सात वर्षाच्या मुलाने गृहपाठाचं पुस्तक हरवलं होतं. एवढ्याशा चुकीवर शाळेच्या प्रिंसिपल रीना (पूर्ण नाव अजून जाहीर नाही) हिने त्याला निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर शाळेच्या ड्रायव्हर अजयला बोलावून मुलाला हातपाय बांधून उलटे लटकवले गेले आणि बेदम झोडपण्यात आलं.
लहानग्याने विनंती केली
👉 “काका, प्लीज मला मारू नका…”
पण त्या निष्पाप विनंतीकडे दुर्लक्ष करून प्रिंसिपल व ड्रायव्हर निर्दयपणे छळ करत राहिले.
व्हिडिओ व्हायरल – संताप उसळला
या घटनेचा व्हिडिओ बाहेर येताच पानीपतच नव्हे तर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली. पालकांचा विश्वास तुडवणारे शिक्षक व स्टाफ समोर आले आणि लोक म्हणू लागले –
👉 “आज एका मुलाला उलटे लटकवलं, उद्या आपल्या मुलांचं काय?”
पोलिसांची धडाकेबाज कारवाई
प्रिंसिपल रीना व ड्रायव्हर अजय यांना अटक करण्यात आली.
न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुजन पब्लिक स्कूल सील करण्यात आलं आहे.
भादंवि व बालहक्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाल कल्याण समितीने चौकशी सुरू केली आहे.
बाल कल्याण समितीचा अहवाल
समितीने चार मुलांचं समुपदेशन केलं. त्यात तीन आणि पाच वर्षांच्या मुलांनीही छळ सहन केल्याचं उघड झालं. समितीने या प्रकारावर सविस्तर अहवाल तयार करून राज्य आयोगाकडे सुपूर्द करण्याची तयारी सुरू केली आहे.
स्टाफविरोधातही आवाज
फक्त प्रिंसिपल व ड्रायव्हर नव्हे, तर शाळेतील इतर स्टाफनेही या घटनेत मूकदर्शकाची भूमिका घेतली. कोणीही मुलाला वाचवायला पुढे आलं नाही. म्हणूनच आता पालक व स्थानिक समाजाचा आक्रोश —
👉 “या छळाला थारा देणाऱ्या सर्व स्टाफवर कारवाई व्हायला हवी.”
घटना तपशील
तारीख: १३ ऑगस्ट २०२५ (व्हिडिओ ३० सप्टेंबर २०२५ रोजी व्हायरल झाला व बातमी बाहेर आली)
ठिकाण: सुजन पब्लिक स्कूल, पानीपत (हरियाणा)
आरोपी: प्रिंसिपल रीना (पूर्ण नाव जाहीर नाही), ड्रायव्हर अजय
कारवाई: अटक, शाळा सील, SIT चौकशी सुरू
समाजाचा सवाल
पालकांना आपल्या मुलांचं भवितव्य शाळांमध्ये सुरक्षित वाटावं असं अपेक्षित असतं. पण जर अशा घटना शिक्षण मंदिरात घडत असतील, तर त्या शाळा शिक्षणाचं केंद्र नसून छळछावणी ठरतात.
संपादकीय ठणाणा
“शाळा जर नरकासमान अत्याचाराचं ठिकाण बनत असतील, तर दोषींवर फक्त औपचारिक कारवाई नाही – कडक, आदर्शवत शिक्षा व्हायला हवी. शिक्षक, स्टाफ किंवा व्यवस्थापन – जे कोणी दोषी असतील, त्यांना वाचवण्याची कोणतीही संधी उरू नये. ही वेळ समाजाने डोळे उघडे ठेवण्याची आहे.”
![]()


