पहाटे ४.१५ वाजता तरुणी थेट पोलीस ठाण्यात लॉजमधील भयावह प्रकार उघड, अलिबाग हादरला लग्नाचं आमिष, विश्वासघात आणि जबरदस्ती गंभीर गुन्ह्याने खळबळ
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 बुधवार , १४ जानेवारी २६
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात पहाटेच्या शांततेत एक धक्कादायक घटना समोर आली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पहाटे ४.१५ वाजता एक १८ वर्षे ७ महिन्यांची तरुणी थेट अलिबाग पोलीस ठाणे येथे दाखल झाली आणि तिने लॉजवर घडलेली धक्कादायक हकीकत पोलिसांना सांगितली.
लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक अत्याचाराचा आरोप
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नितेश पाटील ऊर्फ पप्प्या (रा. खंडाळे, ता. अलिबाग, जि. रायगड) याच्याशी तिचे काही काळ प्रेमसंबंध होते. या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने लग्नाचे आश्वासन देत विश्वास संपादन केला. त्यानंतर मौजे गोंधळपाडा येथील एका लॉजवर नेऊन, तिचा तीव्र विरोध असतानाही इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, असा गंभीर आरोप पीडितेने केला आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ४.१७ वाजता, पोलीस गुन्हा रजिस्टर क्रमांक ०७/२०२६ नुसार अधिकृत नोंद करण्यात आली.
तपासाला वेग, आरोपीचा गुन्हेगारी इतिहास उघड
या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल (पेण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता मुसळे या तपासिक अंमलदार म्हणून काम पाहत आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचा पूर्व गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. सन २०१५ मध्ये महिलेशी छेडछाड व घरात घुसखोरी, तर २०२३ मध्ये मारहाण, धमकी व नुकसानप्रकरणी त्याच्यावर गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पीडितेला संरक्षण, कठोर कारवाईचे संकेत
पोलीस प्रशासनाने पीडित तरुणीला आवश्यक ते संरक्षण दिले असून, आरोपीविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रेमसंबंधांच्या आडून होणाऱ्या फसवणूक व अत्याचाराच्या घटनांबाबत या प्रकरणामुळे पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
👉 न्यायप्रक्रियेवर सर्वांचे लक्ष असून, पुढील तपास सुरू आहे.
![]()

