पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संधी

छावा दि.१५ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर)
शेतीचे आर्थिक जोखमींपासून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेली पंतप्रधान पीक विमा योजना २०२५ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये भात व नाचणी पिकांचा समावेश असून, शेतकऱ्यांना अत्यल्प दरात विमा संरक्षण मिळणार आहे.
योजना वैशिष्ट्ये:
1. सर्वसमावेशक पीक – भात व नाचणी.
2. विमा कंपनी – भारतीय कृषी विमा कंपनी (AIC).
3. सरसगट बाबी – हवामान, कीड-रोग यांसारख्या कारणांमुळे उत्पादनात घट झाल्यास संबंधित महसूल मंडळाच्या उत्पादन अहवालानुसार नुकसान भरपाई मिळेल.
4. हमी उत्पादन – मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाचा विचार करून ५०% हमी उत्पादन ठरवले आहे.
5. विमा हप्ता भरायची अंतिम तारीख – ३१ जुलै २०२५.
पीकनिहाय माहिती:
पीक जोखमीचा स्तर (%) विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) विमा हप्ता दर (%) विमा हप्ता रक्कम (रु./हे.)
भात ३० ₹48,000/- 1.5% ₹720
नाचणी ३० ₹30,000/- 2% ₹600
अर्ज कसा कराल?
जवळच्या कोरे शेतकरी सेवा केंद्रात (CSC) जाऊन किंवा
ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करा.
आवश्यक कागदपत्रे:
7/12 उतारा
आधार कार्ड
बँक पासबुक
सामाजिक घटकाचा दाखला (आवश्यक असल्यास)
लक्षात ठेवा:
नुकसानीनंतर ७२ तासांत मोबाईल अॅप/सीएससी सेंटर/तालुका कृषी कार्यालयात तक्रार नोंदवा.
e-पिक पाहणी व अॅग्रोस्टॅक (Agristack) अनिवार्य आहे.
कृषी योजनेचा हेल्पलाइन क्रमांक: १४४४७
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
कृषी अधिकारी श्री. निलेश पाटील
९६५७५६१९२९
आपल्या गावातील तलाठी, कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशीही संपर्क साधावा.
शेतकरी बांधवांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा!