निशांत पालकरचा तुफान जलवा! – साईनाथ मित्र मंडळाचा १५ वर्षांचा दांडिया उत्सव गाजला

 रेवदंडा मारुती आळीत साईनाथ मित्र मंडळ तर्फे गेली सलग १५ वर्षे दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा शुक्रवार २६ सप्टेंबर २०२५

या दांडियामध्ये दरवर्षी तरुणाई, लेडीज आणि जेंट्स यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. रंगीबेरंगी पोशाख, फुलांची उधळण, रांगोळ्यांची शोभा आणि दांडियाच्या ठेक्यावर थिरकणारी मंडळी – या जल्लोषात प्रेक्षकांचीही प्रचंड गर्दी होते. पाहण्यासारखं वातावरण निर्माण होतं.

यंदाच्या दांडियात मात्र एक विशेष आकर्षण ठरलं ते म्हणजे

निशांत पालकरचा अफलातून डान्स! त्याने रंगलेल्या वातावरणात असा तुफान जलवा दाखवला की उपस्थित सगळेच अक्षरशः मंत्रमुग्ध झाले.

त्याच्या नृत्यकलेची स्टाईल, आत्मविश्वास आणि तालावरची पकड पाहून सगळ्यांचे लक्ष निशांतकडे खिळून राहिले. निशांत पालकरच्या डान्सने या वर्षीच्या दांडिया उत्सवाला वेगळंच रंग भरून दिले.

संपूर्ण रेवदंडा परिसरात सध्या एकच चर्चा रंगली आहे “निशांत पालकरच्या डान्सनं तर सगळ्यांना भुरळ घातली!”

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *