नवी मुंबई, रायगडमध्ये मुसळधार पावसाची दमदार हजेरी

पुढील काही तास निर्णायक

वाऱ्यांचा वेग ५० किमी प्रतितास

अलिबाग | छावा ; दि. ०७ जून, प्रतिनिधी | नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून, पुढील काही तासांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला असून, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

नवी मुंबईतील नेरुळ, वाशी, बेलापूर, सानपाडा, तुर्भे, घणसोली, कोपरखैरणे या भागांमध्ये सकाळपासूनच सतत पावसाचा मारा सुरु आहे. अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला असून, नागरिकांना कार्यालये आणि शाळांकडे जाण्याचाही त्रास सहन करावा लागत आहे.

रायगड जिल्ह्यात अलीबाग, पेण, पनवेल, मुरुड, उरण, रोहा, पोलादपूर या तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत. नद्या, नाले भरून वाहू लागले असून स्थानिक प्रशासन सतर्क आहे.

ताशी ५० किमी वेगाने वाऱ्यांचा इशारा

भारतीय हवामान विभागानुसार, पुढील ३–६ तासांत नवी मुंबई आणि रायगड परिसरात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे झाडे उन्मळण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकामे, होर्डिंग्स, झाडे आणि विजेच्या तारांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांनी घ्यावी ही काळजी :

  • गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका
  • झाडांखाली, होर्डिंगजवळ किंवा कच्च्या इमारतीजवळ थांबू नका
  • वाहन चालवताना विशेष दक्षता घ्याविद्युत उपकरणांचा वापर करताना काळजी घ्या
  • कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा

आपत्कालीन संपर्क :

  • नवी मुंबई महानगरपालिका नियंत्रण कक्ष : 022-27567222
  • रायगड जिल्हाधिकारी कार्यालय: 02141-222444
  • आपत्कालीन सेवा क्रमांक: १०८ / १०० / १०१

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *