नववर्षानंतरही काशीद बीच हाऊसफुल्ल गर्दी साहस करमणूक आणि धोक्याचा संगम

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ सचिन मयेकर
  • 📅 रविवार , ११ जानेवारी २६

३१ डिसेंबरचा जल्लोष संपल्यानंतरही रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद बीच येथे पर्यटकांची अफाट गर्दी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे नववर्षानंतर गर्दी ओसरेल अशी अपेक्षा असतानाही शनिवार रविवारच नव्हे तर आठवड्याच्या दिवसांतसुद्धा काशीद बीचवर देशविदेशातून आलेल्या पर्यटकांचा मोठा ओघ पाहायला मिळत आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा किनाऱ्यावर फुललेली गर्दी आणि पर्यटनाचा उत्साह यामुळे काशीद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे येथे आलेले पर्यटक केवळ समुद्र पाहून थांबत नसून विविध साहसी आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत समुद्रकिनाऱ्यावर घोडेस्वारी करत फेरफटका मारणारे पर्यटक मोठ्या संख्येने दिसत असून उंटाची सवारी विशेषतः लहान मुलांसाठी आकर्षण ठरत आहे त्याचबरोबर घोडागाडी सफारी गाडी ड्रायव्हिंगचे प्रकार पर्यटकांना वेगळाच अनुभव देत आहेत अनेक कुटुंबे आणि मित्रमंडळी या उपक्रमांमध्ये रमून गेल्याचे चित्र आहे समुद्रात उतरून पोहण्याचा आनंद घेत लाटांशी खेळताना फोटो काढणे रिल्स बनवणे हा प्रकारही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यामुळे काशीद बीच हा केवळ समुद्रकिनारा न राहता एक संपूर्ण पर्यटन पॅकेज बनल्याचे दिसते मात्र या आनंदाच्या गर्दीआड धोका दडलेला असल्याचे वास्तव दुर्लक्षित करता येत नाही कारण काशीद बीचवर यापूर्वी अनेकदा समुद्रात बुडण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या असून विद्यार्थी शिक्षक आणि पर्यटकांनी आपले प्राण गमावले आहेत असे असतानाही अनेक पर्यटक सुरक्षेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून समुद्रात खोलवर जाताना दिसतात काही ठिकाणी मद्यप्राशनानंतर पोहण्याचे प्रकारही आढळतात वाढत्या गर्दीमुळे लाइफगार्ड आणि प्रशासनावरही ताण येत आहे त्यामुळे आनंदासोबतच सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे साहसी उपक्रमांसाठी योग्य परवानगी नियमांचे काटेकोर पालन सुरक्षित क्षेत्रांची स्पष्ट आखणी आणि गर्दीच्या काळात अतिरिक्त पोलीस व लाइफगार्ड बंदोबस्त गरजेचा आहे काशीद बीच आजही पर्यटकांचा हॉटस्पॉट असून नववर्षानंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही मात्र हा आनंद अपघातात न बदलता सुरक्षित पर्यटनाचे उदाहरण ठरावे यासाठी प्रशासनासह पर्यटकांनीही जबाबदारीने वागण्याची नितांत गरज आहे

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *