धमाका बातमी — रेवदंडा मोठा कोळीवाड्यातील कुलस्वामिनी मंदिरात चोरी
रेवदंडा मोठा कोळीवाडा येथील कुलस्वामिनी मंदिरात शनिवारी पहाटे २२ नोव्हेंबर २०२५ रोजी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातील देवस्थानातील चांदीचे पवित्र देव गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— मंगळवार – २५ नोव्हेंबर २०२५
या चोरीमध्ये
कुलस्वामिनी देवीचा चांदीचा मुखवटा चोरून नेण्यात आला आहे.
तसेच खंडेरायाच्या चार चांदीच्या मूर्त्या देखील गायब झाल्या आहेत.
या सर्व चोरीस गेलेलेल्या चांदीच्या देवांची एकूण अंदाजे किंमत दीड ते पावणे दोन लाख रुपये असल्याचे प्राथमिक माहितीतून समजते.
कुलस्वामिनी आणि खंडेराय हे कोळी समाजाचे अत्यंत भावनेचे देव मानले जात असल्याने या चोरीमुळे समाजभावना दुखावल्या आहेत. मोठा कोळीवाडा परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.याबाबत शासनाकडे CCTV बसविण्याची मागणी ग्रामस्थांची आहें.
![]()

