धमाका बातमी : गोवंशीय जनावरांच्या चोरी-कत्तलीचा भांडाफोड भिवंडीतून आरोपी अटकेत गो‐हत्येचे तसेच गोवंशीय जनावरांच्या चोरी‐कत्तलीचे प्रकार वाढले
नेरळ पोलीस ठाणे हद्दीत गोवंशीय बैल चोरी करून त्याची कत्तल करून मांस विक्रीसाठी नेता येत असल्याची विश्वसनीय माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी वेगवान आणि धडाकेबाज कारवाई करत आरोपीला भिवंडी (जि. ठाणे) येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – कर्जत –सचिन मयेकर रविवार – १६ नोव्हेंबर २०२५
ही कारवाई नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील PSI सुशील काजोळकर तसेच पोह. वाघमारे, पोशि. केकाण, पोशि. बेंद्रे, पोशि. वांगणेकर यांनी तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने केली.
अटकेनंतर झालेल्या चौकशीत आरोपीने नेरळ पोलीस ठाणे हद्दीत कोदिवले व कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील अंजप येथेही गोवंशीय जनावरे चोरी करून कत्तल केल्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले असून पुढील तपास सुरू आहे.
गो‐हत्येचे तसेच गोवंशीय जनावरांच्या चोरी‐कत्तलीचे प्रकार वाढत असताना पोलिसांनी धडाडीने मोहीम राबवत अशा गुन्ह्यांवर लगाम लावण्यास सुरुवात केली आहे. नेरळ पोलिसांची ही कारवाई त्याच मोहिमेचा एक भाग असून, अशा गैरकृत्यांवर कठोर पावले उचलण्याचा पोलिसांचा निर्धार अधिक दृढ होत आहे.
![]()

