दैवज्ञ समाजाचा अखंड हरिनाम सप्ताह भक्तिभावात प्रारंभ – श्रीमारुती मंदिरात हरिनामाचा गजर!

छावा मराठी न्यूज पोर्टल- सचिन मयेकर- दि.२९ जुलै
दैवज्ञ समाजाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला दिनांक २९ जुलै २०२५ पासून श्रीमारुती मंदिर, रेवदंडा येथे भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे.
या धार्मिक पर्वाचे आयोजन समाजातील ऐक्याचे प्रतीक मानले जाते. दिवसभर हरिपाठ, कीर्तन, भजन, प्रवचन अशा विविध अध्यात्मिक कार्यक्रमांनी श्रद्धाळू मंत्रमुग्ध होत आहेत.
श्री पांचाळेश्वर ट्रस्टचे ट्रस्टी दीपक तळेकर यांनी सर्व दैवज्ञ बांधवांना या पवित्र सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “हरिनाम सप्ताह हा केवळ धार्मिक विधी नाही, तर समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीचे आणि एकात्मतेचे सशक्त माध्यम आहे,” असे त्यांनी नमूद केले.