दत्त भोवाळे यात्रेचा आजचा शेवटचा दिवस दत्त भोवाळे यात्रेत अभूतपूर्व गर्दी चौलपासून भोवाळेपर्यंत तब्बल तीन तास चक्का जाम

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मधुकर मयेकर – सोमवार ०८ डिसेंबर २०२५

चौल-भोवाळे दत्त यात्रेत पाच दिवसांपैकी फक्त शनिवारी संध्याकाळनंतर अभूतपूर्व गर्दी उसळली. रात्री सात वाजल्यापासून सुरू झालेला चक्का जाम तब्बल दोन ते तीन तास कायम होता. गर्दी एवढी तीव्र होती की भाविक एकाच ठिकाणी अडकून राहिले होते. चौलपासून ते भोवाळ्यापर्यंत आणि जाखमाता मंदिर ते दत्त मंदिर प्रवेशद्वारापर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. वीकेंड असल्याने भाविकांसह पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती झाली होती. त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभारलेल्या दुकानांमुळे मार्ग अधिक अरुंद झाला आणि वाहतूक कोंडी तीव्र बनल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

🚨 पोलिस व ग्रामस्थांची संयुक्त धाव — परिस्थिती नियंत्रणात

गर्दीचा ताण रात्री तब्बल बारापर्यंत जाणवत होता. मात्र पोलीस यंत्रणा आणि स्थानिक स्वयंसेवक, ग्रामस्थ यांच्या तत्पर समन्वयामुळे वाहतूक सुरळीत करण्याचे काम शक्य झाले

पाच दिवसांची दत्त जयंती यात्रा — अंतिम टप्प्यात

दत्तजयंती हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सवांपैकी एक असून मार्गशीर्ष पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चौल-भोवाळे येथे पाच दिवसांची भव्य यात्रा भरते आणि दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात. आज, सोमवार (८ डिसेंबर) हा यात्रेचा शेवटचा दिवस आहे.

पुढील वर्षी वाहतूक व्यवस्थेचा सक्षम आराखडा आवश्यक

गर्दी व अनियंत्रित ट्रॅफिकमुळे नागरिकांकडून मागणी यात्रा वाढते आहे… पण नियोजनही वाढले पाहिजे.भाविक व ग्रामस्थांचे सुचवलेले उपाय

दुकानांची मर्यादित मांडणी
वाहतूक मार्गांचे स्वतंत्र नियोजन
पार्किंग झोन निश्चित करणे
पायवाट आणि वाहन मार्ग वेगळे ठेवणे

श्रद्धेचा समुद्र  सुरक्षा व सेवेचा समन्वय दत्ताच्या नावाने जयघोष…रात्री उशिरापर्यंत भक्तांची तुफान गर्दी…भाविकांच्या चेहऱ्यावर भक्ती आणि समाधान…भोवाळ्याची यात्रा श्रद्धेचा महासागर, पण वाहतुकीची परीक्षा🚩

दत्त भोवाळे यात्रेत अभूतपूर्व गर्दी; चौलपासून भोवाळेपर्यंत तब्बल तीन तास चक्का जाम

चौल-भोवाळे दत्त यात्रेत पाच दिवसांपैकी फक्त शनिवारी संध्याकाळनंतर अभूतपूर्व गर्दी उसळली. रात्री सात वाजल्यापासून सुरू झालेला चक्का जाम तब्बल दोन ते तीन तास कायम होता. गर्दी एवढी तीव्र होती की भाविक एकाच ठिकाणी अडकून राहिले होते. चौलपासून ते भोवाळ्यापर्यंत आणि जाखमाता मंदिर ते दत्त मंदिर प्रवेशद्वारापर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. वीकेंड असल्याने भाविकांसह पर्यटकांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती झाली होती. त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभारलेल्या दुकानांमुळे मार्ग अधिक अरुंद झाला आणि वाहतूक कोंडी तीव्र बनल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

यात्रेतील व्यापार – शेकडो स्टॉल्स, करोडोंची उलाढाल

यात्रेत पहिल्या दिवसापासून पाचव्या दिवसापर्यंत आकाश पाळणे, फिरते पाळणे, लहान मुलांसाठी जम्पिंग कॅसल, उड्या मारण्याचे झोपाळे, फुगे विक्रीची स्टॉल्स, महिलांच्या अलंकारांची दुकाने, मिठाई-फरसाण, स्वेटर-चादरी, घरगुती वापराच्या सर्व वस्तू, उसाचे सरबत दुकानें, हाँटेल्स अशा शेकडो दुकानांची गर्दी पाहायला मिळाली. यात्रेत विक्रेत्यांचा उत्साह आणि भाविकांची खरेदी यांचा उत्तम मेळ जमला.

पाच दिवस सतत भाविकांचे प्रचंड प्रमाणात आगमन होत राहिले. लाखो भाविक दर्शनासाठी येऊन गेल्याने यात्रेत करोडो रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापारी वर्गातून सांगितले जात आहे. स्थानिक अर्थचक्राला आणि लहान-मोठ्या दुकानदारांना मोठा आर्थिक हातभार यात्रेमुळे लाभला असल्याचीही चर्चा सुरू आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *