तळोज्यातील बेरोजगारीचा मानसिक तणाव २४ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या रेवदंडा पोलिसांचा तपास सुरू
छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— शनिवार – २२ नोव्हेंबर २०२५
अलिबाग तालुक्यातील नागाव-माळी भेरसे येथील भावेश प्रमोद पाटील (२४) या तरुणाने मानसिक तणावातून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २० नोव्हेंबर २५ रोजी घडली. या घटनेची माहिती त्याचे वडील प्रमोद रघुनाथ पाटील (५५) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात दिली.
भावेश हा जिंदाल ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड, एमआयडीसी तळोजा या कंपनीत कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी त्याने कंपनीला राजीनामा दिला होता. त्यामुळे तो सुमारे दीड महिना बेरोजगार होता. बेरोजगारीतून वाढत गेलेले नैराश्य आणि मानसिक तणाव यामुळे तो अधिकच एकाकी बनला.
घरात कोणीही नसताना, भावेशने आपल्या बेडरूममध्ये छताच्या लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच त्याला तातडीने रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तेथे मृत घोषित केले.
या प्रकरणाचा पुढील तपास रेवदंडा पोलीस करत आहेत.
![]()

