तलवारीसोबत न्यायाची लेखणी संभाजी महाराजांची जिवंत साक्ष इतिहासात अनेकांनी युद्ध जिंकले, पण न्याय जिंकणारे राजे मोजकेच झाले… आणि त्या मोजक्या राजांमध्ये तेजस्वी नाव छत्रपती संभाजी महाराज

         रविवार विशेष         

संभाजी महाराजांनी किल्ले फक्त दगडांनी उभे ठेवले नाहीत…तर त्यांनी ते निष्ठेच्या सनदांनी मजबूत केले प्रत्येक किल्ला उभा होता तलवारीवर पण टिकून होता विश्वासावर.प्रत्येक पायरीवर पाय ठेवताना फक्त उंची नाही वाढत, तर विश्वासही मजबूत होत जातो या दगडांसारखाच भक्कम होता स्वराज्याचा पाया…आणि त्या पायावर उभा होता निष्ठेचा विश्वास! ही पायरी फक्त गडाकडे नेत नाही…ती नेत आहे त्या इतिहासाकडे, जिथे प्रत्येक पावलामागे होती जिद्द, आणि प्रत्येक दगडात होता आत्मविश्वास.

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रायगड १२ एप्रिल २०२६

तलवार हातात असलेला राजा फक्त रणांगण जिंकत नाही. तो मनंही जिंकतो आज आपल्या हातात असलेली ही एक साधी कागदपत्र नाही. ही आहे त्या काळातील स्वराज्याच्या न्यायव्यवस्थेची, निष्ठेची आणि राजधर्माची जिवंत साक्ष चिंचवड येथील त्रंबक व्यंकटेश यांना संभाजी महाराजांनी दिलेली ही सनद…

एक राजा आपल्या प्रजेला कसा ओळखतो, त्यांच्या सेवेची कशी कदर करतो आणि योग्य वेळी त्यांना सन्मानाने कसं उभं करतो याचं तेजस्वी उदाहरण आहे.

        सचिन मयेकर        

चिंचवड येथील त्रंबक व्यंकटेश यांना छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेली ही सनद मोडी लिपीत लिहिलेली असली, तरी तिचा अर्थ अत्यंत स्पष्ट आणि प्रभावी आहे. या सनदेत महाराजांच्या आदेशाने त्रंबक व्यंकटेश यांना त्यांच्या निष्ठा आणि सेवेबद्दल जमीन किंवा काही हक्क (इनाम) प्रदान करण्यात आल्याचे नमूद आहे. तसेच हा हक्क कायमस्वरूपी राहील, त्यावर कोणाचाही अडथळा येऊ नये, आणि संबंधित व्यक्तीने स्वराज्याशी निष्ठा राखावी, असा स्पष्ट संदेश यातून दिला आहे. ही सनद म्हणजे फक्त कागदपत्र नाही. तर ती आहे त्या व्यक्तीच्या कार्याची, प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची राजमुद्रांकित साक्ष. मोडी लिपीत लिहिलेल्या या ओळी आजही सांगतात स्वराज्यात न्याय जिवंत होता, आणि निष्ठेला सन्मान मिळत होता.

रणांगणातील सिंह… आणि न्यायासनावरचा धर्मवीर

संभाजी महाराजांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते रणांगण. मुघलांसमोर न डगमगणारा, संकटांना डोळ्यात डोळे घालून भिडणारा एक ज्वालामुखी. पण हाच राजा रणाच्या गर्जनेतून बाहेर येऊन जेव्हा राज्यकारभार करतो तेव्हा तो फक्त योद्धा राहत नाही  तो बनतो न्यायाचा रक्षक ही सनद सांगते स्वराज्यात तलवारीइतकीच ताकद होती लेखणीला त्रंबक व्यंकटेश एक नाव, जे कदाचित इतिहासाच्या मोठ्या पानांवर फारसं झळकत नाही. पण स्वराज्यासाठी केलेली त्यांची सेवा इतकी मोलाची होती, की स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना सनद देऊन गौरव केला! ही सनद म्हणजे केवळ जमीन किंवा हक्क नाही. हा आहे त्या व्यक्तीच्या निष्ठेचा सन्मा स्वराज्यासाठी उभा राहणारा कधीही एकटा राहत नाही…त्याच्या मागे उभा असतो  एक न्यायप्रिय राजा.

 त्या काळातील प्रशासन – आजच्याही पुढे

आज आपण पारदर्शकतेची भाषा करतो. पण त्या काळातच संभाजी महाराजांनी दाखवून दिलं होतं राज्य चालवायचं असेल तर ते न्यायाने आणि नियमानेच शिक्का, सही आणि लेखी सनद…हे सगळं सांगतं  स्वराज्य हा फक्त स्वप्न नव्हता, तर तो एक व्यवस्थित आणि सक्षम प्रशासनाचा आदर्श होता. मोरया गोसावींची पावन भूमी  चिंचवड…आणि त्या भूमीतील एक व्यक्ती थेट संभाजी महाराजांच्या दरबारात पोहोचते…ही गोष्टच स्वतःमध्ये अभिमानाची आहे! ही सनद सांगते स्वराज्याचा हात फक्त गड किल्ल्यांपुरता मर्यादित नव्हता…तो पोहोचला होता प्रत्येक निष्ठावान माणसापर्यंत. आज आपण इतिहास फक्त पुस्तकात वाचतो…आणि कधी कधी तोही विसरतो…पण ही सनद पाहिली की प्रश्न पडतो आज आपल्या समाजात अशी निष्ठा आहे का?आणि त्या निष्ठेला ओळखणारा असा राजा आहे का?संभाजी महाराजांनी दाखवून दिलं  राजा मोठा त्याच्या तलवारीने नाही, तर त्याच्या न्यायाने आणि माणुसकीने.

 जिवंत इतिहासाची हाक ही सनद फक्त कागद नाही…ही आहे त्या काळातील स्वराज्याच्या आत्म्याची हाक. तलवार चालवणं सोपं असतं पण न्याय देणं कठीण असतं. आणि जो राजा दोन्ही करतो…तोच खरा ‘धर्मवीर’ असतो!”छत्रपती संभाजी महाराज… तुमची ही लेखणी आजही जिवंत आहे, आणि आम्हाला आठवण करून देते  स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नाही… तो आहे न्याय, निष्ठा आणि अभिमानाचा जाज्वल्य इतिहास..

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *