डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता अभियान; १४.६ टन कचरा हटवला
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर १५ मार्च २०२६
रेवदंडा : पद्मश्री व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच महाराष्ट्र भूषण डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या मार्फत आज दिनांक १५ मार्च २०२६ रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेत साळाव तपासणी नाका ते नागाव शास्त्रीनगर थांबा या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा साचलेला कचरा, झाडझुडप व घाण काढून परिसर स्वच्छ करण्यात आला.
अभियानादरम्यान एकूण १४.६ टन कचरा हटविण्यात आला असून या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेत विशेष म्हणजे या उपक्रमात प्रतिष्ठानचे सदस्य श्रमदानासाठी उपस्थित होते. तसेच स्थानिक ग्रामस्थांनीही सहभाग नोंदवाला एकूण ५१६ सदस्य उपस्थित राहून श्रमदान करण्यात आले.
कचरा व घाणीमुळे निर्माण होणारी दुर्गंधी, रोगराई तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.
प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वच्छतेविषयी ठाम संकल्पना निर्माण व्हावी आणि परिसर स्वच्छ व निरोगी राहावा, या उद्देशाने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे असे उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात.


![]()

