झुकेगा नही साला… तोच खरा छावा संभाजी
धर्मासाठी, स्वराज्यासाठी, रक्ताचा प्रत्येक थेंब वाहणारा अद्वितीय योद्धा.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा मंगळवार, २३ सप्टेंबर २०२५
आजच्या पिढीला सिनेमातला “झुकेगा नाही साला” म्हणणारा हिरो आदर्श वाटतो. पण खरी झुंज, खरी उभारी आणि खरी जिद्द दाखवणारा झुकेगा नाही असा आवाज तर साडेतीनशे वर्षांपूर्वीच महाराष्ट्राच्या मातीवर घुमला होता!
केवळ बत्तीस वर्षांच्या तरुण वयात संभाजी महाराजांनी आपल्या प्राणांचा प्रत्येक थेंब धर्मासाठी, स्वराज्यासाठी अर्पण केला.
औरंगजेबाने सहन न होईल असे यातनांचे डोंगर त्यांच्या अंगावर ओतले डोक्याचे केस उपटले, नखे उपसली, डोळ्यातील बुबुळं उपटून घेतली. पण तरीही महाराजांनी एक शब्दही माघार घेतला नाही.
त्यांनी औरंगजेबाला डोळ्यात डोळे घालून दाखवले
👉 “झुकणं माझ्या रक्तात नाही!
👉 धर्मरक्षणासाठी जन्मलो,
👉 मातृभूमीसाठीच मरणार!”
हा खरा हिरो, हा खरा छावा, हा खरा आदर्श म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज.
औरंगजेबाने विचार केला होता की छळ करून महाराज झुकतील. पण झालं उलटच महाराजांनी छळ सहन केला, पण औरंगजेबाच्या अभिमानाला चिरडून टाकलं!
इतिहासात पहिल्यांदा सम्राट औरंगजेब वौकात दाखवला गेला.
म्हणून तरुणांनो, आदर्श हवा असेल तर सिनेमातला हिरो नव्हे, तर रक्ताचा प्रत्येक थेंब मातीत वाहून देणारा तो सिंह पाहिजे.
तो सर्जा संभाजी, तो छावा, तो धर्मवीर…
तोच आपला आदर्श!
![]()

