जीवेत शरदः शतम्

आई, तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आज तुझा दिवस आहे… आणि खरं सांगायचं तर, आयुष्यात दररोज तुला साजरं करावंसं वाटतं.कारण तू आई आहेस – फक्त एक नातं नाही, तर माझं संपूर्ण विश्व.
तुझं ममतेनं ओथंबलेलं हसू,तुझं डोळ्यांमधलं काळजीचं पाणी,तुझ्या मिठीतलं संपूर्ण जग विसरण्याचं बळ –या सगळ्याची मला किंमत उमगतेय आई…जसं जसं मी मोठा/मोठी होत चाललो/चाललेय.
आई,तू कधी थकल्याचं दाखवलंस नाहीस…कधी दुखलं, रडल्याचं जाणवू दिलंस नाहीस…तुझ्या स्वप्नांमध्ये आम्हीच होतो,आणि आमच्या यशात, फक्त तुझं स्मित.
कधी चुकलो/चुकले,कधी रागावलो/रागावले,पण तू मात्र नेहमीच समजून घेतलंस…कारण तू ‘आई’ आहेस –देवाचं सर्वात सुंदर रूप.
आज तुझ्या वाढदिवशी एकच प्रार्थना करते/करतो –देवा, माझ्या आईला निरोगी ठेव,आनंदात ठेव,तीचं मन कायम प्रसन्न असू दे,कारण तिचं हास्य म्हणजे आमचं जीवन.
आई,तू आहेस म्हणून आम्ही आहोत.तुला वाढदिवसाच्या कोट्यवधी शुभेच्छा! तुझ्यावर मनापासून प्रेम आहे! ❤️