जय श्रीराम” म्हटल्यावर ८वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण संतप्त ग्रामस्थांचा संताप शिक्षकाला निलंबित करण्याची मनसेची मागणी
छावा डिजिटल न्यूज पोर्टल — PTI—रायगड — बुधवार – १२ नोव्हेंबर २०२५
रायगड जिल्ह्यात धक्कादायक घटना:
‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने ८वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना जोहे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घडली आहे.
ही शाळा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित आहे.
विद्यार्थ्याला मारहाण करणारा शिक्षक — मोमीन नावाचा असल्याचे समोर आले आहे.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थ, पालक आणि मनसे पदाधिकारी शाळेत धडकले.
भानुदास एकनाथ पाटील (रा. कळवे) यांचा मुलगा जोहे हायस्कूलच्या ८ वी ‘ब’ वर्गात शिकत आहे.
११ नोव्हेंबर रोजी वर्गात मोमीन सर आले असता काही विद्यार्थ्यांनी “जय श्रीराम” असा जयघोष केला.
त्यावर मोमीन सर यांनी ‘आयुष’ नावाच्या विद्यार्थ्याला समजून घेत त्याला बिनदिक्कत मारहाण केली.
हा प्रकार समजताच पालक, नातेवाईक आणि कळवे गावातील नागरिक मोठ्या संख्येने शाळेत जमा झाले.
त्यांनी शिक्षकाला जाब विचारला. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनीही संताप व्यक्त करत
“अशा विकृत विचारसरणीच्या शिक्षकावर कठोर कारवाई करा” अशी मागणी केली.
मनसेची ठाम भूमिका:
धर्मनिरपेक्ष शिक्षणसंस्थेत धार्मिक भावना दुखावणारे शिक्षक असू नयेत,
असे ठाम मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
त्यांनी शिक्षक मोमीन याला त्वरित निलंबित करा आणि गुन्हा दाखल करा,
अशी मागणी केली आहे.
पोलीस कारवाई:
या प्रकरणी दादर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय ब्राम्हणे यांनी
शिक्षकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक प्रतिक्रिया
ग्रामस्थांच्या रोषामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जय श्रीराम म्हणणं हा गुन्हा नाही, पण विद्यार्थ्याला मारहाण करणे अमानुष आहे,
असे अनेक पालकांनी सांगितले.
![]()

