जयोस्तुते हा राष्ट्रप्रेरणेचा मंत्र : दर्श नागोटकर यांचे प्रतिपादन

  • ओएसिस संस्थेचे स्वातंत्र्यवीरांना अभिवादन
  • परिसंवादामधून जाज्वल्य इतिहासाचे स्मरण
रेवदंडा (वार्ताहर/प्रतिनिधी) अखंड राष्ट्रासाठी जीवनाचा प्रत्येक क्षण समर्पिणारे, बहुआयामी व्यक्तित्वाचे धनी आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी आणि कार्याने आजही अनेक पिढ्यांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत आहे आणि उद्याही मिळत राहणार आहे. जयोस्तुते हा फक्त शब्द नाही तर तो भारतमातेच्या स्वातंत्र्य कार्यातील आरंभलेल्या क्रांतीयज्ञाच्या समयीचा राष्ट्रप्रेरणेचा मंत्र आहे, जो आजही नवचेतना देतो, असे प्रतिपादन युवा सामाजिक कार्यकर्ते तथा ओएसिस संस्थेचे स्वयंसेवक समन्वयक दर्श नागोटकर यांनी केले आहे. 

ओएसिस संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त मांडला येथे आयोजित अभिवादनपर परिसंवाद कार्यक्रमात प्रमुख वक्त्याच्या भूमिकेतून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रम अध्यक्ष म्हणून युवा सामाजिक कार्यकर्ते प्रतिक कोळी, संस्थेचे कार्याध्यक्ष यज्ञेश पाटील, सहखजिनदार सार्थक गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्या गीता नागोटकर तथा बोर्ली, कोर्लई, महाळुंगे, काकळघर या परिसरातील स्वयंसेवक उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात दर्श पुढे म्हणाले की, सावरकरांना समजण्यासाठी सात्विक सामंजस्य हवे. पण दुर्दैवाने एका विशिष्ट घराण्याच्या तथाकथित मोठेपणामुळे आणि विशिष्ट व्यक्ती आणि समूहाच्या लांगलुचनामुळे सावरकरांच्या कार्याला काळिमा लावला जातोय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तर कार्यक्रम अध्यक्षांच्या भूमिकेतून उपस्थित प्रतिक कोळी यांनी पूर्वग्रहदूषित इतिहासाला, फसव्या नरेटीव्हला बळी न पडता देशाच्या स्वातंत्र्य क्रांतीचा इतिहास साधार वाचा, अवलोकन करा आणि मगच सत्य जाणून घ्या, असे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तथा प्रतिमा पूजन तसेच स्वा. सावरकर रचित जयोस्तुते या गीत गायनाने करण्यात आली. सुनियोजित आणि शिस्तबद्ध स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सहखजिनदार सार्थक गायकवाड, प्रास्ताविक तथा आभार प्रदर्शन यज्ञेश पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *