छावा विशेष — ओ भूत राजा जल्दी से आजा… पण बिबट्याच्या भीतीने भुतावळ कुठे गायब झाली?

छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —बुधवार १० डिसेंबर २०२५

नागाव–साखर परिसरात बिबट्याचा वावर वाढत असताना एकीकडे लोकांच्या मनात खरी भीती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे पालव फाट्यावरील “भूत” दिसल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून जोरात पसरत होत्या. रात्री दोन ते अडीच वाजता पांढऱ्या कपड्यातील स्त्रीची आकृती दिसल्याचे व्हिडिओ व्हायरल, फोटो व्हायरल, आणि गावात कृत्रिम भयाचं वातावरण पसरवण्याचे प्रयत्न केले होते.

छावाने नेहमीप्रमाणे सत्याची तपासणी केली आणि हे “भूत” प्रकरण पूर्णपणे खोटं असल्याचं उघड झालं—कॅमेऱ्याचा ब्लर, वाहनांच्या हेडलाइटचा प्रकाश आणि मोबाईलच्या शटरचा गोंधळ यामुळे आकृती दिसल्याचा भास निर्माण केला होता. त्यातही कोणीतरी मुद्दाम पांढरे कपडे घालून फाट्यावर उभे राहत लोकांना घाबरवण्याचा खोडसाळ प्रकार करत असल्याची शक्यता स्पष्ट झाली. पोलिसांकडे कोणतीही नोंद नाही, तक्रार नाही, आणि अलौकिक घटनेचा एकही पुरावा नाही.

पण खरी गंमत इथेच रंगते

ज्या क्षणी नागाव–साखर परिसरात बिबट्या रस्त्यावर, छतावर, CCTV मध्ये, खारट पट्ट्यात फिरताना दिसू लागला…

तेव्हापासून पालव फाट्यावरील “भुतांची टीम’’ अचानक गायब!

ज्या लोकांनी रात्री मुद्दाम पांढरे कपडे घालून उभे राहत गावकऱ्यांना घाबरवलं, ते बिबट्याच्या वावरानंतर फाटक्या चादरीप्रमाणे सटकले.

मग गावात एकच चर्चा सुरू

भूत राजा जल्दी से आजा… आता बिबट्याला घालवून दाखव.

चालबाज या मुवि मधील गाण्याचा तोच ठेकाही लोकांच्या तोंडी— “भूत राजा जल्दी से आजा… जल्दी से आजा…

बिबट्या फिरतोय, जरा त्याला पळवून दाखव जरा..

ज्यांनी आधी लोकांना सफेद कपडे घालून घाबरवलं, भीतीचं नाटक बसवलं, व्हिडिओ काढून अफवा पसरवल्या…

ते आता एकही फ्रेममध्ये दिसत नाहीत.

खरी भीती समोर आली की नकली भुतांवरचा संपूर्ण “पिक्चर” संपतो हेच सिद्ध झालं.

आणि यामुळे गावकऱ्यांच्या मनात आता स्पष्ट विचार उमटतो

भूत कधीच नव्हतं…

भय निर्मिती करणाऱ्यांची अफवा होती..

दरम्यान, अशा अफवांमुळे महिला, विद्यार्थ्यांमध्ये अनाठायी घबराट निर्माण होते, रात्री प्रवास करणाऱ्या लोकांना धोका वाढतो आणि अपघाताची शक्यता सुद्धा वाढते. IT Act आणि IPC 505 अंतर्गत अशा अफवा पसरवणे कायद्याने दंडनीय आहे, आणि यावर कठोर कारवाई होऊ शकते असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

छावा मात्र एकच भूमिका स्पष्टपणे मांडतो

सत्य येतं तेव्हा अंधश्रद्धेचा अंधार पळतो.

भूत नसतं… अफवा असते.

आणि त्या अफवेच्या काळोखातही सत्याचा आवाज उभा करणारा एकच — छावा

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *