छावा रवीवार विशेष  कोविशिल्डवरची भीती, अफवा आणि फेसबुकचा खोटेपणा फोडला. छावाचा तपास – सत्याचा दणका

छावा डिजिटल न्यूज पोर्टल –– संपादकीय —रविवार – 30 नोव्हेंबर २०२५

फेसबुकवर गेल्या काही दिवसांत एक पोस्ट मोठ्या वेगात फिरू लागली. पोस्टमध्ये दावा कोविशिल्डमुळे नवा आजार पसरतोय… रक्ताच्या गुठळ्या, हार्ट अटॅक, श्वास घेता येत नाही… सर्वांना होणार आहे…छावा तपासाच्या इनबॉक्समध्ये याबाबत सतत विचारणा येताच आम्ही स्वतंत्र पडताळणी सुरू केली.WHO, ICMR, भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय आणि AstraZeneca यांनी कोर्टात दिलेल्या कागदपत्रांची छावा तपासाने सखोल छाननी केली आणि फोडला मोठा दणका.फेसबुकवर फिरणारा मेसेज 100% फेक, बनावट आणि अफवांच्या कारखान्यातून तयार केलेला आहे.फेसबुक पोस्टचे दावे – आणि छावा तपासाचा सर्जिकल स्ट्राइक

पोस्टमध्ये रक्ताच्या गुठळ्या, हार्ट अटॅक, श्वसनात त्रास, ‘नवा आजार’ असे भयावह दावे होते.मात्र…

1) ICMR – WHO – आरोग्य मंत्रालय : कुठेही “नवा आजार” नाहीजगातील प्रमुख संस्था स्पष्ट सांगतात कोविशिल्ड सुरक्षित आहे. खोट्या दाव्यांना शास्त्रीय आधार नाही.

2) AstraZeneca ने मान्य केलेले दुष्परिणाम ‘अत्यंत दुर्मिळ’

1 लाखांत 1–2 लोकांमध्ये विशिष्ट रक्तगठ्ठा होऊ शकतो.नवा आजार, महामारी, मोठा धोका असा दावा कंपनीने कधीच केला नाही.

3) वायरल पोस्टचा उगम संशयास्पद कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही

ना डॉक्टरांचे नाव, ना सरकारी दस्तऐवज,ना WHO लिंक,ना आकडेवारी.फक्त एक obscure पेज “The Viral Roshu” ज्याचे अनेक फेक पोस्ट आधी सापडलेत.

छावा निष्कर्ष:

पोस्ट बनावट. भीती खोटी. अफवा खरी. गावोगावी फिरणारी दुसरी अफवा कोविशिल्ड घेतल्यापासून थकवा येतो…चहाच्या टपरीवर, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये, वाडीत-वाडी सगळीकडे एक विधान फिरतं लस घेतल्यापासून मी तहानतोय… दम लागतो… शरीर कमजोर…

छावाच्या डॉक्टरांशी केलेल्या पडताळणीतून समोर आलेली सत्ये

लसीनंतर 24–48 तास सौम्य थकवा येणे सामान्य.दीर्घकाळ थकवा कोविशिल्डशी संबंध नाही. तो ताण, झोपेचा अभाव, लाँग कोविड, थायरॉईड, मधुमेह किंवा रक्तक्षय यामुळे असू शकतो.लसीवर दोष टाकणं—विज्ञानाच्या विरोधात आणि अफवा वाढवणारं.

छावा स्पष्ट :

थकवा येतो ही अफवा सुद्धा खोटी.

🇮🇳 कोविशिल्ड जगातली मोठी लस कशी बनली? छावा तपासाचे तथ्य

कोरोनाच्या काळात भारताने जगाला वाचवण्याची ताकद दाखवली. ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनेकाची तंत्रज्ञान परवानगी मिळाल्यानंतर केंद्र सरकारने त्याकाळी PM मोदींच्या नेतृत्वाखाली

उत्पादनासाठी तातडीची मंजुरी कोट्यवधी निधी ट्रायल्सना ग्रीन सिग्नल कंपन्यांना संरक्षण व logistic सपोर्ट यामुळे पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने जगातील सर्वात जलद आणि प्रचंड प्रमाणात लस तयार केली. कोविशिल्डला WHO मान्यता मिळाली आणि ती कोटींच्या जीवांचे रक्षण करणारी प्रमुख लस ठरली.

छावा तपासाचा निष्कर्ष:

कोविशिल्ड – भारताची मोठी वैज्ञानिक ताकद खरा आजार म्हणजे अफवा – छावा चेतावणी

खोटी माहिती फॉरवर्ड करणं हे आजारापेक्षा घातक आहे. लोकात भीती वाढते, उपचार चुकीचे होतात, आणि समाज चुकीच्या दिशेने जातो.

छावाचा अंतिम दणका निष्कर्ष :

कोविशिल्डमुळे नवा आजार” फेक, थकवा येतो म्हणून लस वाईट— फेक,लस सुरक्षित नाही— फेक

छावा तपास = तथ्य, पडताळणी सत्य.

छावा रवीवार विशेष संदेश वाचकांसाठी

अफवा नाही—तथ्य वाचा.

भीती नाही—पडताळणी करा.

छावा तपास तुमच्यासाठी आहे.

डॉक्टर सांगतात : कोविशिल्ड लस नेमकी कशापासून बनली? (वैद्यकीय रचना)

Covishield (ChAdOx1 nCoV-19 vaccine) ही नॉन-रिप्लिकेटिंग व्हायरल व्हेक्टर लस आहे.

यातील प्रमुख वैज्ञानिक घटक खालीलप्रमाणे

1) ChAdOx1 Viral Vector (Recombinant Adenovirus)

चिम्पान्झीचा adenovirus वापरलेला.

हा व्हायरस जिवंत नसतो आणि शरीरात वाढत नाही.

याच्या आत कोरोनाच्या Spike Protein चे DNA बसवलेले असते.

शरीरात गेल्यावर हा DNA “स्पाइक प्रोटीन” तयार करतं आणि त्यामुळे इम्युनिटी निर्माण होते.

2) L-Histidine व L-Histidine Hydrochloride Monohydrate

लसीचा pH स्थिर ठेवतात व व्हायरल कणांचे संरक्षण करतात.

3) Magnesium Chloride Hexahydrate

व्हायरल कण टिकवणारा स्थिरता घटक (Stabilizer).

4) Polysorbate 80

सर्व घटक द्रवात एकसंध मिसळून ठेवण्यासाठी वापरला जाणारा इमल्सिफायर.

5) Ethanol (अत्यल्प प्रमाण)

काही घटक द्रवरूपात स्थिर राहावेत म्हणून.

6) Sucrose (साखर-क्रायोप्रोटेक्टंट)

कोल्ड स्टोरेजमध्येही लस तुटू नये म्हणून संरक्षण देते.

7) Sodium Chloride (मीठ)

शरीरातील osmotic balance जुळवते.

8) EDTA (Ethylenediaminetetraacetic Acid)

अनावश्यक रासायनिक प्रतिक्रिया होऊ नयेत म्हणून.

9) Water for Injection (WFI)

सर्व घटक मिसळण्यासाठी वापरलेले पूर्णतः शुद्ध निर्जंतुकीकृत पाणी.

वैद्यकीय सारांश:

Covishield = Spike Protein DNA असलेला नॉन-रिप्लिकेटिंग Adenovirus + स्थिरता देणारे वैज्ञानिक घटक.

यात जिवंत कोरोना व्हायरस नसतो, तसेच लस शरीरात व्हायरस तयार करत नाही.

अशा अशा प्रकारच्या चुकीच्या, फेक पोस्ट सोशल मीडिया वर फिरत आहेंत

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *