छावा रविवार  विशेष पावनखिंड : जिथे पावसातही आग पेटली

⚔️ लेखकाची नोंद – छावा विशेष संशोधन

बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड यांची गाथा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात आजही आदराने सांगितली जाते. या विषयावर अनेक परंपरा, बखरी आणि स्थानिक श्रद्धा आहेत. काही लोकश्रुतींनुसार बाजीप्रभूंचा अंत्यसंस्कार पावनखिंडीतच झाला, तर काही ऐतिहासिक उल्लेखांनुसार त्यांचे पार्थिव नंतर पिसावरे येथे नेऊन विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘छावा’च्या अथक शोधातून आम्ही या घटनेचा भावनिक, ऐतिहासिक आणि मानवी पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा लेख त्या वीरबलिदानाच्या क्षणाचा पुनःप्रत्यय आहे  जिथे इतिहास संपतो, तिथून “छावा”चा शोध सुरू होतो.

हा लेख ऐतिहासिक संदर्भ, लोकपरंपरा आणि छावा संशोधन आधारित गाथेवर आधारित आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर– रेवदंडा, रविवार – १२ ऑक्टोबर २०२५

 पावनखिंडीत जळले रणवीर – बाजीप्रभू आणि सहाशे मावळ्यांचे वीरांत्यसंस्कार

पावसाच्या सरी थांबत नव्हत्या आकाश काळं होतं दरीत धुके पसरलं होतं आणि रक्ताच्या गंधात रणशिंगाचे सूर विरत होते घोडखिंड रणात बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे सहाशे मावळे रणात झेपावले होते स्वराज्य वाचवण्यासाठी शिवरायांसाठी १६६० सालचा तो पावसाळ्याचा काळ होता पन्हाळगडावर सिद्दी जोहरचा वेढा पडला होता महाराज त्या वेढ्यात अडकले होते पण स्वराज्याचं नेतृत्व कैद होणं हे अशक्य होतं म्हणून महाराजांनी ठरवलं की रात्रीच्या अंधारात वेढा फोडून विशाळगड गाठायचा या योजनेत बाजीप्रभू देशपांडे पुढे सरसावले त्यांनी महाराजांना शब्द दिला की महाराज तुम्ही निघा आम्ही इथे जीव तोडून शत्रूला रोखून धरू महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचेपर्यंत खिंड सोडायची नाही महाराजांनी त्यांना आलिंगन देऊन तलवार दिली आणि म्हणाले बाजी आज स्वराज्याचा भार तुझ्या खांद्यावर आहे रात्रीच्या गडद अंधारात महाराज निघाले आणि बाजीप्रभू आपल्या मावळ्यांसह घोडखिंडीत उभे राहिले समोर आदिलशाही व मोगल सैन्याचा महाप्रचंड लोंढा येत होता पण सहाशे मावळे डोंगरांच्या सावलीत उभे राहून रणगर्जना करत होते जय भवानी जय शिवाजी लढाई सुरू झाली दगड उडत होते भाले घुसत होते आणि बारुदाचा धूर आकाशात मिसळला बाजीप्रभूंचा देह जखमी झाला तरी तलवार थांबली नाही रणाचा आवाज आणि विजांचा कडकडाट एकत्र मिसळला होता आणि मग दूरवर रणशिंग वाजलं महाराज विशाळगडावर पोहोचले बाजीप्रभूंनी आकाशाकडे पाहिलं डोळ्यांत समाधान झळकलं तलवार जमिनीत खुपसली आणि ते रणांगणावर कोसळले त्या क्षणी एक पर्वत कोसळल्यासारखी थरथर जाणवली महाराजांना बातमी मिळाली बाजी गेले क्षणभर नजरेत धुकं आलं पण पुढच्याच क्षणी त्यांनी आदेश दिला बाजी आणि त्यांचे सहकारी हे स्वराज्याचे प्राण आहेत त्यांचे अंत्यसंस्कार पावनतेने करा मावळे पावसात परत आले आकाशात विजा चमकत होत्या पण त्या क्षणी पाऊस थोडा मंदावला त्यांनी कोरडं गवत आणि लाकूड शोधलं काहीजणांनी आपल्या कपड्यांचे तुकडे फाडले थोडं तेल आणि बारुद एकत्र करून चिता रचली जय भवानी जय शिवाजी असा घोष दरीभर घुमला एका मावळ्याने ज्वाला दिली ओल्या लाकडातून धूर निघाला पण त्याच धुरातून आग उठली जणू देवांनीच त्या चितेला प्राण फुंकले होते तेव्हा आकाशात वीज चमकली आणि क्षणभर पावसाचे थेंब थांबले ज्वाला उंच उठली आणि त्या आगीत बाजीप्रभूंचा देह नव्हता जळत होता तो स्वराज्याचा आत्मा ती चिता रात्रीभर पेटती राहिली पहाटे जेव्हा धूर विरला तेव्हा फक्त राख आणि अंगार उरला त्या राखेतूनच जन्म झाला पावनखिंडीचा त्या दिवशी फक्त वीरांचे शरीर जळले नाही स्वराज्याचं अमरत्व पेटलं शिवाजी महाराज विशाळगडावर उभे राहून म्हणाले जोवर स्वराज्य जिवंत आहे तोवर बाजीप्रभू आणि त्यांचे मावळे अमर राहतील ही खिंड आता घोडखिंड नाही ही आहे पावनखिंड आजही त्या खिंडीवर उभं राहिलं की वारा कुजबुजतो महाराज पोहोचले का आणि डोंगर उत्तर देतो हो बाजी महाराज पोहोचले पण तुझ्या रक्ताने हे स्वराज्य आजही जिवंत आहे

पावनखिंडीनंतरची राख — तिचं विसर्जन आणि सन्मान

बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अंत्यसंस्कार पावनखिंडीतच झाले. लढाईनंतर काही दिवसांनी पाऊस पुन्हा सुरू झाला होता. पण मावळ्यांनी त्या राखेला अगदी देवपुजेसारखा सन्मान दिला.

त्या राखेचा व्यवहारिक आणि धार्मिक भाग असा झाला असावा 

1. मुख्य चितेची राख (बाजीप्रभूंची)

बाजीप्रभूंच्या चितेची राख पूर्ण थंड झाल्यावर मावळ्यांनी ती काळजीपूर्वक गोळा केली. त्या राखेचा एक भाग त्यांनी खिंडीतल्या उंच जागी (जिथे आज समाधी आहे) दफन केला. त्या ठिकाणी नंतर मातीचा छोटा ढिगारा करून, त्यावर दगड रचले गेले  याच ठिकाणी आजची बाजीप्रभू देशपांडे स्मारक/समाधी उभी आहे.

2. बाकी राख आणि राखाडी माती  ती पावसाच्या सरींनी थोडीथोडी वाहून गेली आणि दरीत मिसळली. काही मावळ्यांनी त्या राखेचा एक मूठभर भाग विशाळगडावर नेऊन महाराजांच्या चरणी अर्पण केला, अशी लोकश्रुती कोल्हापूर आणि वसंतगड भागात आजही सांगितली जाते.

3. महाराजांनी दिलेला आदेश

ही माती पवित्र आहे, हिला हात लावणं म्हणजे स्वराज्याला नमस्कार करणं. या भावनेतूनच ती राख पाण्यात विसर्जित न करता, त्या जागीच दफन करून समाधीच्या रूपात जपली गेली.

गजापूर आणि वसंतगड परिसरातील ज्येष्ठ लोक आजही म्हणतात

त्या राखेला पावसाचं विसर्जन नव्हतं, देवाचा अभिषेक होता. पावसाच्या थेंबांनी ती राख मातीशी मिसळली, आणि तीच माती ‘पावनखिंड’ बनली. म्हणजेच  राख नदीत वा तळ्यात विसर्जित करण्यात आली नाही; ती त्या भूमीतच विलीन झाली, आणि त्या मातीला देवत्व प्राप्त  झाले.  बाजीप्रभू देशपांडे व मावळ्यांची राख आजही त्या खिंडीच्या मातीत आहे. तीच माती म्हणजे स्वराज्याची अस्थिकुंभ  जिच्यावर उभं आहे ‘पावनखिंड’ हे पवित्र स्थान.

मोगल व आदिलशाही सैनिकांचा शेवट  विस्मृतीत गेलेले मृतदेह

पावनखिंडच्या त्या रणानंतर सहाशे मावळ्यांचे अंत्यसंस्कार झाले, भूमी पवित्र झाली. पण जे शत्रू होते मोगल आणि आदिलशाही सैनिक  त्यांचा शेवट अतिशय भयावह आणि करुण होता. त्या लढाईत हजारो शत्रू मारले गेले होते. घोडखिंडीतून त्यांच्या देहांचा थर पडला होता, आणि पाऊस सतत कोसळत होता. शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्यावर आणि नंतर मावळे परत गेले, तेव्हा कोणीही त्या शत्रूंच्या मृतदेहांना हात लावला नाही. सिद्धी जोहर आणि त्याचे सैन्य मागे हटले होते. ते रणभूमीकडे परत फिरले तेव्हा खिंडीत फक्त रक्ताळलेले कपडे, तुटलेल्या तलवारी आणि कुजलेले देह उरले होते. त्या वेळी पर्वतांच्या सावल्यांमध्ये रानातील प्राणी  लांडगे, कोल्हे, गरुड, गिधाडं  यांनी त्या मृतदेहांवर ताव मारला. ती जागा काही दिवस मानवी वासापासून पूर्ण ओस पडली होती. काही दिवसांनी सिद्धी जोहरच्या माणसांनी पुन्हा खिंड पाहिली, पण त्यांच्या समोर फक्त राख, हाडं आणि जळालेली माती होती.ते थांबलेही नाहीत  कारण ती भूमी आता शत्रूंची नव्हती, ती स्वराज्याची समाधीभूमी झाली होती. त्या दिवसानंतर मोगल आणि आदिलशाही फौजांनी ती खिंड पुन्हा कधीच ओलांडली नाही. त्यांना वाटत होतं  त्या खिंडीत मावळ्यांच्या आत्मा अजूनही रणशिंग फुंकतात. मावळ्यांची राख पवित्र माती झाली, तर शत्रूंचे मृतदेह निसर्गाच्या हाती गेले. एकांचा अंत्यसंस्कार झाला, दुसऱ्यांचा नाश झाला  पण इतिहासात जिवंत राहिले फक्त तेच, ज्यांनी स्वराज्यासाठी मरण पत्करलं. ज्यांच्या मृत्यूतही तेज आहे, तेच अमर ठरतात. आणि म्हणूनच आजही घोडखिंड नाही म्हणत कोणी 

ती पावनखिंड आहे…

कारण तिथे रक्त सांडलं, पण स्वराज्य जन्मलं.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *