छावा’चं कॅलिग्राफी रूप – अलिबागकर अल्केश जाधव यांची हटके कलाकृती!
अलिबाग तालुक्यातील अलिबाग शहरातील अल्केश जाधव (जि. रायगड) यांनी ‘छावा’ हा शब्द कॅलिग्राफीच्या अनोख्या शैलीत साकारला आहे.
छावा डिजिटल न्यूज पोर्टल— सचिन मयेकर , रेवदंडा—रविवार—२८ सप्टेंबर २०२५
विशेष म्हणजे ‘छावा’ हे नाव केवळ कलेतूनच नाही तर पत्रकारितेतूनही जनतेसमोर आहे. रायगडसह कोकण, मुंबई, पुणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचलेले लोकप्रिय असलेले ‘छावा’ न्यूज पोर्टलही याच नावाने धडक मारत असून, आता हाच शब्द कलेतून झळकला आहे.
लाल रंगात रंगवलेल्या या अक्षरांना बंगाली कॅलिग्राफीची झलक दिली असून त्यातली धार, वक्रता आणि जाज्वल्यपणा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो.
न्यूज पोर्टलचं नाव आणि ही कॅलिग्राफी – या दोन्हींच्या संगतीत ‘छावा’ हा शब्द सामर्थ्य, उर्जा आणि प्रेरणा देणारा ठरत आहे.
🙏 छावा न्यूज पोर्टल परिवार तर्फे कलाकार अल्केश जाधव यांना विशेष धन्यवाद! 🙏
![]()

