चौल- बागमळा – रेवदंडा परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

छावा दि.०३ जून रेवदंडा (सचिन मयेकर)

महिला टू व्हीलरवरून खाली पडून जखमी

गावात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचे आणखी एक उदाहरण आज दिसून आले. आज सकाळच्या सुमारास एका महिलेला भटक्या कुत्र्याने अचानक टू व्हीलरसमोर पाठ काढल्याने ती तोल जाऊन खाली पडली. या घटनेत संबंधित महिला जखमी झाली आहे.

सदर महिला नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून निघाल्या होत्या, मात्र कुत्र्याने अचानकपणे रस्ता अडविल्याने वाहनाचा तोल जाऊन हा अपघात झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गावात वाढत्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव – नागरिक त्रस्त

गावात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना अलीकडे घडल्या आहेत.

पागार मोहल्ल्यातील एका धक्कादायक घटनेत, अलीकडेच पिसाळलेल्या कुत्र्याने एका लहान मुलीवर हल्ला करून तिच्या हाताचे अक्षरशः लचके तोडले. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

तसेच, दररोज कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असून अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. शाळकरी मुले, वृद्ध आणि महिला यांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे.
दुचाकी वाहनाची पाठ काढून अंगावर जाण्याचे प्रकार रोजच रस्त्यावर घडत आहेत .त्यामुळे अपघात होत आहेत.


ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजनांची मागणी केली असून कुत्र्यांचा बंदोबस्त करून गावात शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.


Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *