चौलमध्ये विकासाचा नवा टप्पा! काटकर आळी रोडचे लोकार्पण; डॉ. सचिन राऊळ यांचे ठाम आश्वासन – कामातूनच विकास दाखवणार

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍ सचिन मयेकर | चौल
  • 📅मंगळवार | १७ फेब्रुवारी २०२६

चौल (ता. अलिबाग) येथील काटकर आळी परिसरातील रस्त्याचे काम पूर्ण होऊन तो नागरिकांसाठी वाहतुकीस खुला करण्यात आला. या कामाचे श्रेय रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांच्या पुढाकाराला दिले जात आहे. स्थानिक विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

काटकर आळीतील रस्ता पूर्ण झाल्याने नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. पावसाळ्यात होणारी गैरसोय, चिखल आणि वाहतुकीतील अडथळे आता दूर झाले असून परिसरातील दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार आहे. व्यापारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. राऊळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जनतेच्या विश्वासाने मिळालेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. चौल गावचा कायापालट केवळ आश्वासनांनी नाही, तर प्रत्यक्ष कामातून करून दाखवणार. चौल परिसरात अडीअडचणीच्या वेळी धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आतापर्यंत विविध विकासकामांतून त्यांनी आपली कार्यशैली सिद्ध केली असून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणखी वेगाने काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे. या कार्यक्रमाला प्रवीण राऊत, संदीप म्हात्रे, तनुजा घरत, महेंद्र घरत, निलेश राऊत, अशोक गुरव, आशिष पाटील तसेच ‘चौल परिवर्तन आघाडी’चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काटकर आळी रोडच्या लोकार्पणामुळे चौल गावातील विकासाला नवी चालना मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. “कामातूनच विकास दाखवणार” हा संदेश देत डॉ. राऊळ यांनी पुढील योजनांचीही संकेत दिले. चौलमध्ये विकासाची ही गती अशीच कायम राहील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *