चिखलामुळे भाविकांची पायपीट, पण भजनांनी विसर्जन सोहळा झाला भक्तिमय

आशुतोष केळकर, राजेश केळकर, मधुसूदन आठवले, घनश्याम शर्मा, नारायण शर्मा, निरज शर्मा, प्रशांत साने, यांनी टाळ-झांजांच्या गजरात अप्रतिम भजन-गाणी सादर केली. विशेष म्हणजे राजेश केळकर यांनी ढोलकीवर अफलातून साथ देत सर्वांची मने जिंकली.
सचिन मयेकर,‘छावा’ पोर्टल २९ ऑगस्ट २०२५
दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनावेळी समुद्रकिनारी चिखलामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला. चिखलामुळे भाविकांना मोठे बंदर किनाऱ्यापर्यंत पायपीट करावी लागली. विसर्जनाची पायपीट त्रासदायक ठरत असतानाच मारुती आळी येथील विसर्जन मिरवणुकीत भक्तिरसाची उधळण झाली.
आशुतोष केळकर, राजेश केळकर, मधुसूदन आठवले, घनश्याम शर्मा, नारायण शर्मा, निरज शर्मा, प्रशांत साने यांनी टाळ-झांजांच्या गजरात अप्रतिम भजन-गाणी सादर केली. विशेष म्हणजे राजेश केळकर यांनी ढोलकीवर अफलातून साथ देत सर्वांची मने जिंकली. मारुती आळी मधील कलाकारांच्या या सादरीकरणामुळे पायपिटीचा थकवा विसरला गेला आणि विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
“गणरायाच्या विसर्जनातील कष्ट विसरायला लावणारा हा भक्तिरसाचा क्षण – मारुती आळीतील कलाकारांनी खऱ्या अर्थाने भक्तांची मने जिंकली.”