गॅस टंचाईतही हार नाही! चुलीवर स्वयंपाक करून सुरू ठेवले ‘कोको पाम’ उपाहारगृह

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर १५ मार्च २०२६

मुंबई, पनवेल आणि रायगड परिसरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अनेक हॉटेल्स बंद असल्याच्या बातम्या समोर येत असताना रेवदंडा परिसरातील एका हॉटेल मालकाने मात्र जिद्दीने परिस्थितीवर मात करत आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे.

रेवदंडा, थेरोंडा फाटा (ता. अलिबाग, जि. रायगड) येथे असलेल्या कोको पाम उपाहारगृह या कोंकणी सी-फूडसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलच्या मालक भारती प्रफुल्ल मोरे यांनी व्यावसायिक गॅस उपलब्ध नसतानाही हार न मानता चुलीवर स्वयंपाक करून उपाहारगृह सुरू ठेवले आहे.

सध्या व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद असल्यामुळे अनेक हॉटेल्सना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र गॅसची वाट पाहत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करण्याचा निर्धार करत भारती मोरे यांनी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला. चुलीवर स्वयंपाक करत उपाहारगृहातील जेवणाची सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

थोडे अधिक कष्ट आणि वेळ लागत असला तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उपाहारगृह सुरू ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या अनेक ठिकाणी गॅस टंचाईमुळे हॉटेल्स बंद असल्याच्या बातम्या समोर येत असताना या उपाहारगृहाने मात्र वेगळा आदर्श ठेवला आहे.

रेवदंडा परिसरात कोंकणी सी-फूडसाठी प्रसिद्ध असलेल्या या उपाहारगृहात शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय असून ग्राहकांची सेवा अखंड सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

संपर्क : ८२३७७१९४९४ / ७७७५८०२३५४

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *