गुन्हेगारीचे माहेरघर पुणे — धक्कादायक! ‘दया करा’ म्हणत महिला रडत होती… पण तरीही तलवारीने हल्ला – पुण्यात दाम्पत्यावर घरात घुसून रक्तरंजित हल्ला!

पुणे – शहराला हादरवणारी एक थरारक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून संतापलेल्या एका तरुणाने आपल्या साथीदारांसह घरात घुसून एका दाम्पत्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. ही घटना ५ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता येरवडा परिसरात घडली असून, हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल पुणे (PTI )मंगळवार – ०७ ऑक्टोबर २०२५

व्हिडिओमध्ये महिला आरोपीसमोर हात-पाय जोडून दया मागताना दिसते, मात्र तरीही आरोपी थांबत नाही आणि तलवारीने वार करतो. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे

५६ वर्षांच्या महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार

५ ऑक्टोबरच्या रात्री काही वाद झाल्याच्या रागातून, दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी पुन्हा दाम्पत्याच्या घरासमोर आले. तेथे उभे राहून त्यांनी महिलेचा आणि तिच्या पतीचा अपमान केला, शिवीगाळ केली.

वाद वाढताच साकीब मोहम्मद शेख या आरोपीने दगड उचलून फिर्यादीवर फेकला, तर त्यानंतर तलवार काढून सपासप वार करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, साजीद उर्फ डी.जे. मोहम्मद शेख, शाहनवाज उर्फ चांद शेख आणि सुलतान उर्फ कैफर शेख हे त्याचे साथीदार घरात घुसले. त्यांनी घरातील भांड्यांची तोडफोड करून नुकसान केले आणि दाम्पत्याला धमकावले.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित आरोपींवर पुढील कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे

कलम 307 (खुनाचा प्रयत्न),

कलम 452 (घरात बेकायदेशीर प्रवेश),

कलम 427 (संपत्तीचे नुकसान),

कलम 504 आणि 506 (शिवीगाळ व धमकी).

पोलिसांनी सांगितले की, आरोपी पूर्वीपासून स्थानिक पातळीवर बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असल्याची माहिती समोर येत आहे. हल्ल्यानंतर काही आरोपी फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

घटनेचा व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी मोबाईलवर टिपला आहे. त्यात महिला “दया करा, मारू नका” असे ओरडताना दिसते, मात्र आरोपी निर्ढावलेपणाने तलवारीचे वार करताना दिसतात. या व्हिडिओने लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे

येरवडा पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात, ही घटना रात्री झालेल्या किरकोळ वादाचा परिणाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, आरोपीं

च्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *