गुन्हेगारीचे माहेरघर पुणे — आंदेकर टोळीचा कहर नगरसेवक खूनाचा बदला आयुष कोमकरला १२ गोळ्यांचा पाऊस, बंडू आंदेकर महाराष्ट्राबाहेरून रंगेहात पकडला मास्टरमाईंड कृष्णा अद्याप फरार

नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने पुन्हा रक्तरंजित कारवाई केली.

पुणे, ९ सप्टेंबर (PTI) २०२५

शुक्रवारी (५ सप्टेंबर) कोमकर कुटुंबावर भीषण हल्ला करत गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरला गोळ्यांनी पेरलं. आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी तब्बल १२ गोळ्या झाडल्या, त्यापैकी ९ थेट आयुषच्या शरीरात रुतल्या. बेसमेंटमध्ये दबा धरून झालेल्या या हत्येनं शहर हादरलं.

या खुनानंतर आयुषची आई कल्याणी कोमकरने आंदेकर टोळीवर, म्होरक्या बंडू आंदेकरसह तब्बल १३ जणांवर गुन्हा दाखल केला. पण गुन्हा दाखल व्हायच्या आधीच टोळी फरार झाली. गणेशोत्सवाच्या काळातच ही हत्या घडल्याने पोलिसांची झोप उडाली होती.

मात्र अखेर पोलिसांनी मोठं ऑपरेशन राबवलं. मध्यरात्री महाराष्ट्राबाहेर ट्रॅप लावून बंडू आंदेकरसह सहा जणांना जेरबंद करण्यात आलं. याआधी यश पाटील आणि अमित पाटोळे हे दोघे आधीच अटकेत होते. त्यामुळे अटकेतील आरोपींचा आकडा आठवर पोहोचला आहे.

या मोठ्या कारवाईत बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, त्यांची आई आणि आणखी दोन जणांना पोलिसांनी पकडलं. तिन्ही दिवसांची गुप्त पाळत, गणेशोत्सव व आयुषचा अंत्यसंस्कार शांततेत पार पाडल्यानंतर पोलिसांनी ही मोठी मोहीम यशस्वी केली.

तरीही या रक्तरंजित कहाणीचा मास्टरमाईंड कृष्णा आंदेकर अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून, संपूर्ण पुण्यात प्रचंड खळबळ

उडाली आहे.

आतापर्यंत अटकेत आलेले आरोपी

1. सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६०) – आंदेकर टोळीचा म्होरक्या

2. स्वराज निलंजय वाडेकर (वय २२)

3. तुषार निलंजय वाडेकर (वय २६)

4. लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०) – (बंडू आंदेकर कुटुंबातील महिला)

5. वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०)

6. आणखी एक संशयित महिला (पोलिसांनी मध्यरात्री कारवाईत पकडलेली)

7. यश सिद्धेश्वर पाटील – हत्येत थेट सहभागी

8. अमित प्रकाश पाटोळे (वय १९) – हत्येत सहभागी

 म्हणजेच आतापर्यंत एकूण ८ आरोपी अटकेत आहेत.

 अजून फरार आरोपी

कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४१) – मास्टरमाईंड

शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय ३१)

अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१)

शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९)

अमन युसुफ

पठाण उर्फ खान

सुजल राहुल मेरगु (वय २३)

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *