गरुडपाडा परिसरात दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात
अलिबाग तालुक्यातील गरुडपाडा परिसरात आज सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
“अलिबाग प्रतिनिधी”छावा’ डिजिटल न्यूज पोर्टल. १४ सप्टेंबर २०२५

स्थानिकांच्या मते, अलिबागच्या दिशेने दुचाकी स्वार जात असताना गरुडपाडा गावाजवळ समोरून चारचाकी गाडी येत होती. याच दरम्यान अचानक दोघांमध्ये धडक होऊन दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला.

अपघातानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आवश्यक उपाययोजना सुरू केली. दरम्यान वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या द अलिबाग पोलीस स्टेशन ची असल्याचे समजले ही घटना अलिबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.

![]()

