खारपाड्यात दिवसाढवळ्या दरोडा महिलेचे तोंड साडीने बांधून मारहाण रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ पेण प्रतिनिधी रायगड रविवार ०८ मार्च २०२६

 पेण तालुक्यातील खारपाडा परिसरात दिवसाढवळ्या घरात घुसून महिलेवर हल्ला करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. 7 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास खारपाडा येथील मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या एका घरात ही घटना घडली. त्या वेळी घरात महिला एकट्याच असल्याची संधी साधत दोन अज्ञात इसमांनी घरात जबरदस्तीने प्रवेश केला.

आरोपींनी महिलेचे तोंड साडीने बांधून तिला मारहाण करत धमकावले आणि घरातील कपाटे व साहित्याची झडती घेतली. त्यानंतर रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण सुमारे 1 लाख 12 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.

ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दिवसाढवळ्या घडलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेची भावना पसरली आहे.

या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पेण पोलीस करीत आहेत.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *