क्रूरतेचा कळस ! त्याने मांजराला चक्क 9 व्या मजल्यावरून फेकलं, शॉकिंग CCTV फुटेज व्हायरल
क्रूरतेचा कळस ! मुक्या प्राण्याच्या जीवाशी खेळ
अत्यंत हादरवणारी अशी ही घटना त्या इमारतीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली आहे.मुंबईतील एक अतिशय अस्वस्थ करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका बिल्डींगमध्ये राहणाऱ्या माणसाने 9 व्या मजल्यावरून एका मांजराला थेट खाली फेकल्याचं दिसत आहे.
आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे अतिशय थंड डोक्याने केलेल्या या कृतीनंतर त्या इसमाने शांतपणे खाली वाकून ते मांजर पडलं की नाही याचीही खात्री केली. त्या बिल्डींगमध्ये 9 व्या मजल्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झालेली असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या घटनेत त्या बिचाऱ्या मुक्या जीवाचा, पाळीव मांजराचा हकनाक बळी गेला.मिळालेल्या माहितीनुसापर, मालाडच्या मालवणी परिसरातील एक बिल्डींगमध्ये ही भयानक घटना घडली असून खाली फेकलं गेल्याने अवघ्या 15 महिन्यांचे ते पाळीव मांजर मृत्यूमुखी पडलं. रिपोर्टनुसार, कासम सय्यद असे त्या इसमाचं नाव असून तो याच इमारतीमधील रहिवासी आहे. या प्रकरणात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवल्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्या नराधमाच्या या कृत्याने संताप व्यक्त होत असून मांजराच्या गेलेल्या जीवासाठी हळहळ व्यक्त होत आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे.
व्हिडीओ व्हायरल
या घटनेचं शॉकिंग सीसीटीव्ही फूटेज समोर आलं असून ते सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झालंय. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या सुरुवातीला खिडकीजवळील बुटांच्या रॅकवर एक मांजर उभी असल्याचं दिसलं. थोड्या वेळाने, एक माणूस बॅग घेऊन तिथे आला, मांजरीकडे पाहिलं आणि पुढे गेला. मात्र त्यानंतर त्याने जे केलं ते पाहून सगळेच हादरले.