क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा अदम्य दीपस्तंभ

१५ नोव्हेंबर – जयंती विशेष लेख

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लिहिताना जे काही क्रांतीवीर, जननायक आणि आंदोलनकर्ते डोळ्यासमोर उभे राहतात, त्यातल्या उज्ज्वल, तेजस्वी आकाशातील सर्वात प्रखर तारा म्हणजे भगवान बिरसा मुंडा.

छावा डिजिटल न्यूज पोर्टल —सचिन मयेकर – शनिवार – १५ नोव्हेंबर २०२५

आज १५ नोव्हेंबर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण या अद्वितीय क्रांतीपुरुषाला शतशः वंदन करतो.आदिवासींचा देव, संघर्षाचा योद्धा – “धर्ती आबा” बिरसा मुंडा   बेगूसैंडा (झारखंड) येथील एका आदिवासी कुटुंबात जन्मलेला हा तेजस्वी मुलगा पुढे “धर्ती आबा” म्हणून ओळखला जाऊ लागला. अन्याय, शोषण, जमीनकाबीज व ब्रिटिशांचे अत्याचार याविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा त्यांनी हजारो मुंडा आदिवासींना दिली.लहानपणापासूनच बुद्धिमान, तीक्ष्ण आणि नेतृत्वगुणांनी परिपूर्ण बिरसाने आपल्या समाजाकडे पाहिलं तेव्हा त्याला दिसली जमीन हिसकावणारी बुकी व डिकू व्यवस्थाअत्याचार करणारे ब्रिटिश अधिकारी गरीब व आदिवासी समाजाची लुटमारआणि याच वेदनेतून उगम झाला “उलगुलान” या महान बंडाचा.“उलगुलान” अन्यायाविरुद्ध लोकविद्रोहाचा ज्वालामुखी बिरसाने दिलेला संदेश सरळ, स्पष्ट आणि धगधगता होता अबुवा दिसुम, अबुवा राज”आपली जमीन, आपला राज या घोषणेमुळे आदिवासी समाजात एक नवचैतन्य निर्माण झाले.त्याने धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अशा तीनही क्षेत्रात मोठी क्रांती घडवली.बिरसाने लोकांना मद्यापासून दूर राहण्याचे, शिक्षण घेण्याचे, शुद्ध व शौर्यपूर्ण जीवन जगण्याचे संदेश दिले.1899-1900 दरम्यान उठवलेल्या उलगुलान बंडाने ब्रिटिश सत्तेला हादरा दिला.जरी ब्रिटिशांनी कट-कारस्थान करून बिरसाला कारागृहात टाकले, तरी त्याचा विद्रोह आजही आदिवासी अस्मितेचे प्रतीक बनून जिवंत आहे.२५ व्या वर्षीही अमर झालेली क्रांती फक्त २५ वर्षांच्या अल्पायुष्यात बिरसा मुंडा यांनी जे काम केले, ते अनेकांना आयुष्यभरातही जमणार नाही.कारागृहात संशयास्पद परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला, परंतु ब्रिटिशांना त्यांच्या चळवळीची भीती इतकी होती की त्यांनी नंतर मुंडा आदिवासींच्या जमिनीवरील हक्कांना कायद्याने मान्यता द्यावी लागली.ही विजयाची सर्वात मोठी शिक्कामोर्तब होती.आजही प्रेरणादायी — राष्ट्राच्या एकतेचा ध्वजवाहक बिरसा मुंडा हे फक्त आदिवासी समाजाचे नायक नाहीत, तर ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे आद्यक्रांतिकारक आहेत.समानता, स्वाभिमान, आत्मनिर्भरता आणि स्वराज्य यांचे ते जिवंत प्रतीक आहेत.त्यांचे जीवन सांगते हक्कांसाठी लढताना वय, सत्ता किंवा परिस्थिती काहीही आड येत नाही. जिथे अन्याय, तिथे विद्रोह बिरसा मुंडा अमर रहे.

 

उलगुलान जिंदाबाद.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *