कौटुंबिक समारंभासाठी उपस्थित कुटुंबावर काळाचा घाला

• घरफोडीत साडेअकरा तोळे सोने लंपास

पनवेल (प्रतिनिधी, दि. ०५ जून) तालुक्यातील नेवाळी गावात उटण्याच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घात घातला. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी गावात घडलेल्या या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले असून, संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, प्रमोद दशरथ खांडेकर हे आपल्या कुटुंबासमवेत नेवाळी, पनवेल येथे वास्तव्यास आहेत. २ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सर्वजण गावातील नातेवाइकांच्या उटण्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. घराला कुलूप लावून ते बाहेर पडले होते.

कार्यक्रमानंतर घरी परतल्यानंतर त्यांच्या वडिलांनी मुख्य दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आतून बंद असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी मागील दरवाजाची पाहणी केली असता, त्याचे कुलूप तुटलेले होते आणि दरवाजा उघडाच होता.

खांडेकर कुटुंबाने घरात प्रवेश केल्यावर बेडवर ठेवलेले दागिन्यांचे बॉक्स खाली पडलेले दिसले. अधिक तपासणी केली असता सुमारे साडेअकरा तोळ्यांचे सोन्याचे दागिने, यामध्ये आठ तोळ्यांची गंठण, चोकर, चैन, अंगठ्या, रिंग, कुडी व टोंगल असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले

खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, फिंगरप्रिंट व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *