काशीद समुद्रात पोहण्यासाठी उतरलेला तरुण परतलाच नाही पंचवीस तासांनी मृत्यूची बातमी हृदय पिळवटून टाकणारी

  • छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
  • ✍️ सचिन मयेकर
  • 📅 सोमवार , १९ जानेवारी २६
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काशीद समुद्रकिनारा येथे पुन्हा एकदा पर्यटनावर मृत्यूचे सावट पसरले असून पोहण्यासाठी समुद्रात उतरलेला २४ वर्षीय तरुण तब्बल पंचवीस तासांनंतर मृतावस्थेत आढळून आला आहे काशीद समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या सोमनाथ राजेश भोसले वय २४ रा काळेपडळ हडपसर पुणे सध्या शिर्डी जि अहिल्यानगर या तरुणाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे
१८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी एक ते तीन वाजण्याच्या सुमारास सोमनाथ भोसले हा आपल्या कंपनीतील मित्रांसोबत काशीद समुद्रकिनारी आला होता समुद्र शांत दिसत असल्याने तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला मात्र काही वेळातच तो लाटांमध्ये दिसेनासा झाला मित्रांनी आरडाओरड करत तात्काळ शोध सुरू केला परंतु तो कुठेही आढळून न आल्याने मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली
घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी काशीद समुद्रकिनारी कार्यरत जीव रक्षक तसेच जलक्रीडा व्यावसायिकांच्या मदतीने व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली समुद्रातील जोरदार प्रवाह उंच लाटा आणि बदलते हवामान लक्षात घेऊन शोधकार्य राबविण्यात आले मात्र रात्रभर सोमनाथचा काहीही थांगपत्ता लागला नाही
अखेर आज दुपारी साडे तीन ते चारच्या सुमारास काशीद समुद्रात सोमनाथ भोसले याचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी काशीदकडे धाव घेतली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
दरम्यान काशीद समुद्रकिनारी वाढती पर्यटकांची गर्दी आणि वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरताना सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे मात्र प्रश्न कायम आहे की काशीदसारख्या पर्यटनस्थळी किती बळी गेल्यावर नियम गांभीर्याने पाळले जाणार आहेत

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *