कारभार सुधारणार नसेल तर मुरुड डेपो बंद करा

कारभार सुधारणार नसेल तर मुरुड डेपो बंद ठेवा : अरविंद गायकर
* प्रशासनाचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर ?
* आगारातील विविध प्रश्नी आम.महेंद्रशेठ दळवींची भेट घेणार
कोर्लई,ता.२५(राजीव नेवासेकर)साळाव पूलावरुन बारा टनांपर्यंत वाहतुकीची घातलेली अट,त्यामुळे नवीन गाड्या मिळण्यात होणारी अडचण,अपु-या कर्मचाऱ्यांमुळे वेळेवर कामे होत नसल्याने गाड्यांचे टायर फुटणे,चाके बाहेर येणे, अर्ध्या रस्त्यात गाड्या
बंद पडणे प्रमाण पाहता प्रवाशांना जिव मुठीत धरून धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने,प्रशासनाचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतणार असेल,कारभार सुधारणार नसेल तर मुरुड डेपो बंद ठेवा.असा आक्रमक पवित्रा आमरण उपोषणकर्ते पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांना विभाग नियंत्रक दिपक घोडे व मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे यांनी मुरुड आगारात चर्चेसाठी बोलावले असता घेतला.
यावेळी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर,सचिव शैलेश वारेकर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पेण येथील विभाग नियंत्रक दिपक घोडे, मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर,शहर अध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा तृप्ती पाटील, शहर उपप्रमुख संगिता परकर,सुशील ठाकूर, पोलिस हवालदार मकरंद पाटील आदी. उपस्थित होते.
मुरुड आगाराला नविन बस मिळणे बाबत नविन बसेस या मध्यवर्ती कार्यालयाच्या नियोजनानुसार आगारात मिळत असतात, त्याप्रमाणे मुरुड आगारास बसेस मिळतील. मात्र मुरुड अलिबाग मार्गावरील साळाव पुलावरून १२ टनापर्थात वाहतुक करावी.असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र आहे. त्यानुसार या पुलावरून १६.२०० टना पर्यंत वाहतुक करावे किंवा कसे? याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागास दोन पत्रे या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहेत. त्यांच्याकडुन याबाबत या विभागास कळविण्यात आल्यानंतरच नविन बसेस बाबत पुढील कार्यवाही करणे शक्य होईल. ही बाब विभाग नियंत्रक, रा.प. रायगड विभाग, यांनी स्वतः वारंवार आपल्याशी चर्चा करून अवगत केलेली आहे.कर्मचारी स्वच्छता गृहाबाचत कर्मचारी स्वच्छतागृहाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या बाबतचा कार्यादेश ठेकेदार यांना देण्यात आलेला आहे.नविन कर्मचारी भरती सदरचा निर्णय हा मध्यवर्ती कार्यालयाशी संबंधित असल्याने यावर कार्यवाही सध्या करता येणार नाही. बसेस नादुरुस्त बाबत व वेळेत सुटण्याबाबत या बाबत आगार व्यवस्थापक यांनी आगारातील सहाय्यक वाहतुक निरिक्षक, कार्यशाळा कर्मचारी, वाहन परिक्षक, वाहतुक नियंत्रक, यांना बसेस वेळेवर सुटणेबाबत,बसेस स्वच्छ धुवुन मार्गस्थ करणे बाबत तसेच रस्त्यावर धावताना बसेस नादुरुस्त होणार नाही या बाबतच्या सक्त सुचना देण्यात आलेल्या असून अरविंद गायकर यांनी दि.२६.०६.२०२५ रोजीच्या आमरण उपोषणापासुन परावृत्त व्हावे यासाठी दि.२३ जून रोजी मुरुड आगारात चर्चेसाठी बोलावण्यात आले असता कारभार सुधारणार नसेल तर मुरुड डेपो बंद करा असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी भरत बेलोसे, संदीप पाटील यांनी मुरुड डेपोतील सद्यस्थिती व प्रवाशांना सहन करावा लागणारा त्रास याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी त्यांनी अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्याशी संपर्क साधला असता दि.२ जुलै रोजी अलिबाग येथे याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोळा टनावरील गाड्या वाहतुकीची परवानगी मिळताच मुरुड आगाराला नवीन गाड्या देण्यात येतील तसेच आगातील विविध समस्या सोडविण्यासाठी, कर्मचारी स्वच्छता गृहाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल.याबाबत कायदेशीर ठेकेदार यांना देण्यात आले आहे.नवीन कर्मचारी भरतीत शिकाऊ कर्मचारी भरती करण्यात येणार आहे.तसेच त्यामधील शिकाऊ मॅकेनिक देण्यात येतील, याबाबत आगार प्रमुख यांना वेळेत, सुस्थितीतीतील गाड्या सोडण्यात कार्यवाही करण्याच्या सूचना पेण – विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी दिल्या व उपस्थित झालेल्या सीएनजी पंप मुरुड आगारात होण्याबाबत ,मुद्द्यावर मध्यवर्ती कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात येईल असे सांगितले.
यावर उपस्थितांचे समाधान न झाल्याने अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी, रा.प.महामंडळाचे विभाग नियंत्रक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचे समवेत दि.२ जुलै रोजी अलिबाग येथे संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याने सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनी तुर्तास आपले आमरण उपोषण स्थगित केले जात असल्याचे सांगितले.