‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला यांचे निधन; वयाच्या ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२  व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन.

छावा, दिनांक २८ जून मुंबई विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवाला हिचे वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. बिग बॉस 13 आणि ‘कांटा लगा’ या आयकॉनिक म्युझिक व्हिडीओमुळे लोकप्रिय झालेल्या शेफालीला शुक्रवारी रात्री उशिरा तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

शेफालीला तिचा पती पराग त्यागी आणि इतर तीन व्यक्तींनी अंधेरीतील बेलेव्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आणले होते. रुग्णालयाच्या रिसेप्शनवरील कर्मचाऱ्याने तिच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. पुढील तपासासाठी शेफालीचे पार्थिव कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

शेफालीच्या मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली असून सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. शेफालीचे निधन इतके अचानक झाले की अनेकांना त्यावर विश्वासच बसलेला नाही. अद्याप तिच्या कुटुंबीयांनी किंवा प्रतिनिधींनी अधिकृत निवेदन दिलेले नाही.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *