कर्तव्यावर असलेल्या पोलिसावर हल्ला; आरोपी दोषी शास्त्रीनगर प्रकरणी अलिबाग सत्र न्यायालयाचा कडक निकाल
- छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल
- ✍️ सचिन मयेकर
- 📅 शुक्रवार , ३0 जानेवारी २६
अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आरोपीस अलिबाग सत्र न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. शास्त्रीनगर, कोळीवाडा येथील या गंभीर घटनेचा निकाल दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी सत्र न्यायालय-३, अलिबाग येथील मा. न्यायाधीश श्री. एस. डी. भगत यांच्या न्यायालयात लागला. न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३५३ अंतर्गत एक हजार रुपये दंड व एक महिना साधी कैद, तसेच भा.दं.वि. कलम ३३३ अंतर्गत तीन हजार रुपये दंड व एक महिना सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी की, अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी पोलीस कर्मचारी बीट मार्शल ड्युटीवर असताना रायगड कंट्रोल रूमकडून शास्त्रीनगर, गुरुजी हॉटेलजवळ कोळीवाडा येथे घरातील कपाटाची काच फोडल्याची माहिती पीटर मोबाईल अलिबाग यांना प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे फिर्यादी पोलीस कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत घटनास्थळी पोहोचले असता आरोपी घराबाहेर येऊन अचानक आक्रमक झाला. “तुम्हाला येथे कोणी बोलावले, माझ्याकडे येण्याचा काय अधिकार आहे,” असे म्हणत आरोपीने पोलिसाच्या अंगावर धाव घेतली. आरोपीने पोलिसाच्या गणवेशाचा कॉलर पकडून हातावर व छातीवर मारहाण केली तसेच कपाटाच्या फुटलेल्या काचेने जाणीवपूर्वक दुखापत करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून अशा कृत्यांना कोणतीही माफी नसल्याचा ठाम संदेश या निकालातून समाजात गेला आहे. सरकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हात उगारल्यास कठोर परिणामांना सामोरे जावे लागते, हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या प्रकरणात सेशन केस क्रमांक १५/२०२३ (अलिबाग सी.आर. नं. १४/२०२२) अंतर्गत आरोपी विजय मारुती राठोड (वय ३४ वर्षे, रा. शास्त्रीनगर, कोळीवाडा, ता. अलिबाग, जि. रायगड) याच्यावर भा.दं.वि. कलम ३५३, ३३२ व ३३३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे यांनी केला. न्यायालयीन कामकाजात पोलीस हवालदार पी. जे. पाटील यांनी कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुनील डोंगे व पोलीस हवालदार एस. बी. खैरनार यांनी महत्त्वाची भूमिका बज
![]()

