उठा उठा दिवाळी आली…….

(छावा दिवाळी विशेष भाग २ – सचिन मयेकर)

छावा डिजिटल न्यूज पोर्टल –सचिन मयेकर–संपादकीय  सोमवार – २० ऑक्टोबर २०२५

उठा उठा दिवाळी आली मोतीस्नानाची वेळ झाली आईचा तो गोड ओलसर आवाज अजूनही कानात घुमतोय अजून पहाट फुटायची बाकी बाहेर मंद गार वारा वाहतोय आणि घरात मात्र गूळ तेल आणि उटण्याचा सुगंध दरवळलेला असतो आई देवाघरात दिवा लावत असते बाबा चांदीच्या वाटीतलं उटणं मिसळून ठेवतात त्या उटण्याचा गंध चंदन केशर आणि प्रेमाचा गंध आजही मनात साठलेला आहे त्या वेळेला दिवाळी म्हणजे केवळ सण नव्हता ती होती घराच्या ऊबेतली एक भावना आईचा तो आवाजच दिवाळीची खरी सुरुवात असायचा उठा रे दिवाळी आली असं म्हणत ती आम्हाला झोपेतून उठवायची आम्ही डोळे चोळत देवाजवळ धावत जायचो देवाजवळ दिवा पेटलेला असे सुगंधी अगरबत्तीचा धूर आणि आईचा चेहरा त्या उजेडात चमकत असायचा थंड जमिनीवर पाय ठेवून बसायचं आई गरम पाण्याच्या घागरांनी अंगावर पाणी ओतायची आणि उटणं लावायची त्या क्षणी असं वाटायचं की हीच खरी दिवाळी आहे नवीन कपडे घालायचे देवाला नमस्कार करायचा आणि मग थेट फराळाच्या डब्याकडे धावायचं आईनं केलेल्या चकल्या करंज्या लाडू चिवड्याचा वास घरभर पसरलेला असायचा देवाला दाखवायचं झालं की लगेच आमची नजर डब्यांवर असायची आई रागवायची पण तिच्या डोळ्यांत गोड हसू असायचं त्या वेळची दिवाळी म्हणजे आनंदाचा सण नव्हे तर प्रेमाचा सण होती मोठं झालो काळ बदलला पण त्या बालपणीच्या दिवाळीचा प्रकाश आजही मनात उजळतो आता घराघरात दिवे लागतात पण त्या आवाजातलं प्रेम कुठेच ऐकू येत नाही मोबाईल सजावट आणि फटाके सगळं आहे पण त्या सकाळीच्या त्या आवाजातला गंध आणि ऊब आता नाही त्या जुन्या दिवाळीत पैसाचं नव्हतं पण समाधान खूप होतं आज आपण घरभर दिवे लावतो पण मनातला दिवा पेटवणं विसरतो त्या काळात आईच्या ओठांवरून आलेला उठा उठा दिवाळी आली हा आवाज म्हणजे जणू लक्ष्मीचा आशीर्वादच होता त्या काळात दिवाळी आली की घर उजळायचं आता दिवाळी आली की आठवणी उजळतात दिवाळीचा खरा अर्थ हाच की बाहेर कितीही प्रकाश असला तरी मनातला अंधार घालवला नाही तर सण अपुरा राहतो दिवाळी म्हणजे फक्त सजावट नव्हे ती आहे प्रेम एकत्र येणं आणि घराच्या ऊबेतला आनंद आजही कुठल्याही फटाक्याचा आवाज आईच्या त्या उठवण्याच्या गोड आवाजाशी जुळत नाही…..

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *